Skip to main content

Posts

शांतीत क्रांती - मैत्री, विनोद आणि आत्मभानाची गोष्ट

काल खूप दिवस ज्याची वाट पाहणं सुरू होतं त्या ' शांतीत क्रांती ' या वेब सिरीजचं binge watch केलं. सारंग साठ्ये, पॉला मॅक्ग्लिन  दिग्दर्शित या बहुचर्चित सिरीज मध्ये 3 मित्रांची कथा आहे. प्रसन्न ( ललित प्रभाकर ), श्रेयस ( अभय महाजन ) आणि दिनार (आलोक राजवाडे ) यांची ही आजच्या तरुणाईला रिलेट होईल अशी गोष्ट. तीन मित्र, अगदी लंगोटी यार. अगदी 'हम दोस्त थे, दोस्त है और हमेशा रहेंगे' कॅटेगरी. तिघे गोवा रोड ट्रिप प्लॅन करतात पण श्रेयस त्या दोघांना 'शांतीवन' या ठिकाणी आणतो. एका ध्यान आश्रमासारखी ही जागा. या मित्रांच्या वरवरच्या हसत्या-खेळत्या आयुष्यात आत वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, जे ते शेअर करत नाहीत.तिघेही वरून आनंदी दिसले तरी आतून पार गोंधळलेले, विस्कळीत मनस्थितीतले. आपल्याला बऱ्याचदा डिनायलमध्ये जगण्याची सवय असते,  बऱ्याचदा आपला स्वतःचा स्वतंत्र विचार, मत न मांडता, लोक काय म्हणतील याचाच विचार करून, 'मी कोण आहे, मला नेमकं काय हवंय?' हे प्रश्न आपण स्वतःलाही विचारत नाही. त्यामुळे काही केल्या वास्तवाचा आपण स्वीकार करत नाही. आपण जसे आहोत त्या आपल्यातल्या मूळ व्यक्ती...

सुमित्रा भावे - न सोसणारी एक्जिट

 सुमित्रा भावे गेल्या. माझी आवडत्या दिग्दर्शक जोडगोळीची अपरिमित हानी झाली. या बाईंनी मला काय काय दिलं त्यांच्या चित्रपटातून. दहावी फ, दोघी, देवराई, अस्तु, वास्तुपुरुष, कासव.   नुसतं भरभरून देणं, देणं आणि देणं. मला त्यांची शैली अफाट आवडायची. एक प्रयोगशील आणि दर्जेदार कलावंत हरपला. नेमकं काय आणि कसं बोलावं कळत नाही. सुन्न व्हायला होतं आहे. वयाच्या 78व्या वर्षी ही व्यक्ती चुटपुट लावून जाते. अर्थात सगळ्यांच्या मरणाने असाच त्रास होतो, पण मला राग येतो आहे. असं कोणी जातं का?  निसर्गाने असं कसं करावं असं काहीसं त्यांच्या विचारांच्या विसंगत मनात येत आहे.  विविध सामाजिक प्रश्न, त्यांचा नात्यांवर होणारा परिणाम, बंधने, जीवाची होणारी घुसमट याने पिचणारी स्थिती त्यांनी अनेकदा पडद्यावर चितारली. उपायही सुचवले. प्रेक्षक थोड्या थोडक्या का प्रमाणात त्या प्रश्नाबाबत डोळस आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊन बाहेर पडायचे. 10 राष्ट्रीय पुरस्कार मिळवणं येऱ्यागबाळयाचं काम नाही. सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या सुवर्णकमळासह इतर अनेक पुरस्कारप्राप्त 'कासव'. असुरक्षित वाटलं की कासव...

द मॅरीड वूमन - रिक्त की मुक्त?

Alt बालाजी ची नवीन वेब सिरीज द मॅरीड वूमन पाहिली. मंजू कपूर यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित. आस्था एक ड्युटीफुल, कर्तव्यदक्ष बायको, सून, आई पण त्याच बरोबर एक कॉलेज टीचर. संथ आणि एकसुरी बनलेलं आहे तिचं आयुष्य. सतत गृहीत धरलं जाणं, सतत दुय्यम वागणूक. पण विना तक्रार नाती निभावत राहायचं. कारण समाजाने तसे नियम आखलेत. तिची कहाणी तीच आपल्याशी बोलत सांगते पूर्णवेळ.  ऐजाज खान(इमाद शाह), तिने लिहिलेले नाटकाचे दिग्दर्शन करणारा एक स्वतंत्र, पुरोगामी विचारांचा, सर्वधर्मसमभाव मानणारा, त्याच्याकडे ओढली जात आहे आस्था पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो आणि तिच्या आयुष्यात येते पिपलिका.(मोनिका डोग्रा) ऐजाज ची विधवा. एक आर्टिस्ट. आस्थाहून खूप निराळी. दोघी दोन ध्रुवांसारख्या, तरी एकमेकींच्या जवळ खूप जवळ येतात, प्रेमात पडतात. पिपलिकाच्या मते, "प्यार जेंडर नही, रुह देखके होता है".  काय आहे नक्की या दोघींचं नातं? केवळ तनाचं की मनाचंही? भावनांचा कोसळणारा प्रपात, जो चिंब करत आहे दोघींनाही. हे सगळं हवं हवसं आहे आस्थाला. पण ती विवाहित आहे, तिला एक सर्वसाधारण कुटुंब आहे, मुलं आहेत. ती त्यांना सोडून ...

हर

आपण याच यंत्रयुगात इतके अवलंबून आहोत यंत्रांवर, obsessed आहोत की नजीकच्या भविष्यात जर आपण त्यांच्या प्रेमात पडलो तर नवल नाही. ही गोष्ट फक्त थिएडोर (Joaquin Phoenix) आणि एक ऑपरेटिंग सिस्टीम समँथा (आवाज- Scarlett Johansson) यांच्यातल्या नातेसंबंधाची नाही.  एकलकोंडा, बायकोपासून विलग अशा थिएडोरला एकटेपणा घालवायला कुणीतरी हवं आहे. मग ते एखादी ऑपरेटिंग सिस्टीम का असेना तो तयार आहे. समँथा आणि थिओ यांच्यात एक नातं तयार होतं जे मैत्रीपलीकडे आहे. एकटेपणा, नैराश्य, शारीरिक गरज भागवण्याइतपत तो समँथाच्या केवळ आवाजावर  अवलंबून आहे की अजून काही जास्त भावना आहेत? ती सतत म्हणते तसं तिला भावना आणि शरीर प्राप्त होतं का? थिओडोरप्रति तिच्या वागण्याला भावना म्हणायचं का? त्या दोघांच्या नात्याला प्रेम म्हणायचं का? डिवोर्स पेपर्सवर सही घेण्यासाठी तो बायकोकडे जातो तेव्हा बायको तो यंत्रासोबत रिलेशनमध्ये आहे हे कळल्यावर त्याला नात्यांपासून दूर पळणारा, स्वप्नात रमणारा, सत्य झटकणारा, परिस्थिती नाकारणारा म्हणते. समँथा सोबततरी नाते स्थिर राहणार का? या साऱ्यांची प्रश्नोत्तरे म्हणजे लेखक, दिग्दर्शक Spike Jonze...

शरदचंद्र चटोपाध्याय

शरदचंद्र चटोपाध्याय हे एक मोठे बंगाली साहित्यिक होते. उपेक्षितांचे अंतर्बाह्य चित्रण करणारे,  परंपरेच्या जोखडात अडकलेला समाज, खास करून स्त्री वर्ग यांच्या व्यथांचं कथन बंगाली साहित्यात 'शरद साहित्य' म्हणून एक मानदंड ठरलं. आजही आहे. भारतीय साहित्यात त्यांचे योगदान दूरगामी व परिणामकारक आहे.  त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1876 रोजी झाला.  कॉलेजात असताना त्यांनी 'भागलपूर साहित्यसभेची' स्थापना करून 'छाया' हे हस्तलिखित सुरू केले. रवींद्रनाथांसारखं अभिजात साहित्य जन्माला घालायचं त्यांचं स्वप्न होतं. गरिबीमुळे त्यांना शिक्षण ही अर्धवट सोडून द्यावं लागलं. पण त्यांचं साहित्यावरील प्रेम कधीच कमी झालं नाही. पैशाच्या चणचणीमुळे त्यांनी नोकरी धरली, त्यांचे संवेदनशील मन समाजातील तळागाळातून सुख-दुःखाचे निरीक्षण करत होते त्यावेळी त्यांची 'बडदीदी' ही अप्रकाशित कादंबरी कोलकात्यात 'भारती' मासिकात क्रमशः छापून आणली गेली आणि बंगाली साहित्यात 'शरदचंद्र' उदयाला आला. शोषित, मूक, दबलेल्या समाजाचा आरसा म्हणजे त्यांचं साहित्य. कल्पनारम्यतेऐवजी वास्तवतेकडे झुकणारा असा त्या...

गुलाबो सिताबो : बेग़मने खाल्लेला चित्रपट

बॉलीवूडमध्ये इतके हुशारीने बनवलेली 'ड्रॅमॅटिक सटायर' फारच कमी. डार्क कॉमेडीचा इतका सुंदर वापर  'जाने भी दो यारो' इतका नसला तरी तरी वेगळ्या खुबीने केला आहे. जुही चतुर्वेदी लिखित आणि शुजित सरकार दिग्दर्शित हा 'गुलाबो सिताबो' हा तो चित्रपट.लखनौ शहराची पार्श्वभूमी, मोडकळीस आलेली 'फातिमा महल' नामक खास लखनौवी हवेली, त्याची मालकिण बेग़म (फ़ारुख़ जाफ़र) हिचा नवरा एक हावरट, कंजूस ' सतत आयजीच्या जीवावर' असलेला ८० ला येऊनही ही हवेली कधीतरी आपल्या मालकीची होईल या भ्रमातला म्हातारा मिर्झा , आणि ढेर सारे भाडेकरू. अगदी ३०रु ते ७० रु इतक्याशा भाड्यावर राहणारे. आयुषमान खुरानाने साकारलेला 'बांके' हा 'मै गरीब हू' म्हणत आपल्या बहिणींना सांभाळणारा भाडेकरु सतत भाडे देण्यास कुचराई करण्यात पटाईत. यांच्या आयुष्यात पुरातत्व खात्याचे लोक आणि बिल्डर मंडळी यांची एन्ट्री होते आणि एरवी एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त मिर्झा (अमिताभ बच्चन) आणि बांके (आयुषमान) यांची अवस्था सुरुवातीला आणि शेवटाला दाखवलेल्या गुलाबो आणि सिताबो या कठपुतळ्यांसारखी होते.  अमिताभ बच्चनचे ...

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...