Skip to main content

राजर्षी शाहू महाराज व नामदार भास्करराव जाधव

आज २६ जून. शाहू जयंती व भास्करराव जाधव यांची पुण्यतिथी. भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या भास्कररावांच्या व्यक्तीमत्त्वाची जडणघडण मुंबईत झाली. डॉ. रा.गो. भांडारकर हे त्यांचे सहाध्यायी होते.  मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई इलाख्यात सर्वप्रथम आले होते. विद्यार्थी दशेत ते मुंबईच्या कामाठीपूऱ्यात सत्यशोधक समाजाचे द्रष्टे कार्यकर्ते रामय्या व्यंकय्या आय्यवारू यांच्याकडे सुमारे ३ वर्षे राहत होते. तेथील वातावरण सत्यशोधक समाजाच्या तत्त्वज्ञानाने भारलेले होते. भास्कररावांच्या व्यक्तिमत्त्वावर तेथे सत्यशोधक विचारांचे खोलवर संस्कार झाले . महात्मा फुले, आय्यवारू स्वामी , प्रा. केळूसकर ही त्यांची दैवते बनली . अशाप्रकारे ते सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते बनले. 

भास्करराव एम.ए होऊन मुंबईत कायद्याच्या पदवीसाठी अभ्यास करत होते . तेव्हा पुण्यातील 'डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी'चे अध्वर्यू अ‍ॅड. गंगाराम भाऊ म्हस्के यांनी त्यांचे नाव शाहू महाराजांना सुचवले. भास्काररावांचा संस्कृतचा गाढा व्यासंग होता आणि इतिहासाचेही त्यांनी आवडीने अध्ययन केले होते. माणसांची पारख आणि गुणग्राहकता या शाहू महाराजांतील दुर्मिळ गुणांमुळे त्यांनी भास्कररावांना आग्रहाने करवीर संस्थानात नेमून घेतले. स. १८९५ ते १९२१ या काळात भास्कररावांनी मुख्य महसूल अधिकारी , जिल्हा व सत्र न्यायाधीश, असिस्टंट प्लेग व फॅमिन कमिशनर, १९०१ च्या शिरोगणतीचे उपाधीक्षक इ. अनेक महत्त्वाची पदे भूषवली. बहुजन समाजाचे शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निर्मुलन, ब्राह्मणेतरांचे राजकारण या बाबतीत त्यांचे व शाहू महाराजांचे विचार समान होते. पिढ्यान पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेला बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण हा मूलमार्ग आहे हे ओळखून महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यासाठी महत्प्रयास केले. त्यामध्ये भास्कररावांची मोलाची साथ लाभली.

बुद्धीप्रामाण्यवादी   सत्यशोधक विचारांच्या भास्कररावांना मूर्तीपूजा अमान्य होती. परमेश्वर आणि भक्त यांच्यात पुरोहित या मध्यस्थाची,दलालाची गरज नाही, अशी त्यांची धारणा होती. 'क्षात्रजगद्गुरु' पद स्थापना व इतर काही मतभेद असूनही  महाराजांचा त्यांच्या प्रती कसलाही किंतू नव्हता. त्यांच्याबद्दल आपुलकी थोडीही की झाली नव्हती . त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदर ते बाळगून होते. शाहू महाराजांचा प्रगाढ विश्वास असल्यामुळे कोल्हापूर नगरपालिकेच्या कारभाराची सर्व सूत्रे तब्बल १४ वर्षे भास्कररावांच्या हाती राहिली. या काळात त्यांनी नगराचा बराच कायापालट केला. शहर स्वच्छ्ता, सार्वजनिक आरोग्य, नागरी सुविधा, यांच्यात लक्षणीय वाढ झाली. कोल्हापूर शहराचा चेहरा-मोहर बदलला. ठिकठिकाणी सहकारी सोसायट्या, पतसंस्था यांची निर्मिती झाली, त्यातूनच सहकारी बँकांची निर्मिती झाली. आपल्या संस्थानातील सहकारी चळवळीचा भास्करराव जाधव हे आत्मा होते असे खुद्द शाहू महाराजांनी नमूद केले आहे.

शाहू महाराजांची परिवर्तनाची व्यापक दृष्टी व कृती असामान्य होती. दीर्घकालीन सहवासामुळे या व्यापक सुधारणावादी द्रष्टेपणाची छाप भास्कररावांवर पडलेली दिसते. करवीरची जनता त्यांचा 'कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार' असा त्यांचा अभिमानाने उल्लेख करते.

राजर्षी शाहू महाराज व नामदार भास्करराव जाधव या दोघांनाही भास्कररावांच्या या पणतीकडून मानाचा मुजरा...

(२६ जून, २०१४)

Comments

Saee said…
waah! Far changli mahiti. :)
Your Marathi is impeccable. Far chan lihites!
RS: सत्यशोधक भास्करराव विठोजीराव जाधव- निरज धुमाळ https://www.rayatsamachar.com/2021/06/blog-post_34.html via@RayatSamachar, Ahmednagar
मनोरंजनासह प्रबोधनासाठी...
रयत समाचार, अहमदनगर
ज्ञानदीप लावू जगी...
रामायणावर नवा प्रकाश - भास्करराव जाधव
https://drive.google.com/file/d/19qM9DRoNCtcUeSxWsivzr8BgYtraSb3F/view?usp=drivesdk

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ