उत्तमाचा ध्यास दे तू, प्रयत्नांची कास दे
भक्ती, शुद्धी, संपन्नतेची आम्हा सदा तू आस दे
भक्ती, शुद्धी, संपन्नतेची आम्हा सदा तू आस दे
मार्ग शोधू आमुचा, तू धैर्य दे, सामर्थ्य दे
संघर्ष ही होती अहिंसक, एवढा विश्वास दे
संघर्ष ही होती अहिंसक, एवढा विश्वास दे
येतील ही कधी संकटे, त्या झेलण्या बळ खास दे
जगणे माझे सार्थ व्हावे, एवढे मज श्वास दे
जगणे माझे सार्थ व्हावे, एवढे मज श्वास दे
सेवा घडावी योग्य तेथे, हेवा नको ही बुद्धी दे
ध्येय अन परिपुर्णतेचा सदैव तू सहवास दे...
ध्येय अन परिपुर्णतेचा सदैव तू सहवास दे...
Comments