Skip to main content

Posts

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...

मंत्र : एक विचारमंथन

आत्ता 'मंत्र' पाहून आले. चित्रपटाचा नायक निरंजन (सौरभ गोगटे) याच्या घरी पिढीजात पौरोहित्य हा व्यवसाय आहे. वडील, काका, थोरला भाऊ देखील हेच काम करतात. याला जर्मनीत देवळात पुरोहित म्हणून जाण्याची संधी मिळते, तो वडिलांकडून धर्मविधींचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊ लागतो. दुसरीकडे नायिका अंतरा (दीप्ती देवी) ही नास्तिक आहे. तिचा कर्मकांड, रुढींवर राग आहे. तिचे धर्मविषयक विचार, निरंजनचे मित्र, त्यांचे विचार, धर्माचा राजकारणात चाललेला चुकीचा वापर या सगळ्यात निरंजन गुरफटलेला आहे. घुसमटतो आहे. प्रयत्न करूनही त्याला व्यक्त होता येत नाही आहे.आस्तिक-नास्तिक भेद, धर्मविधी यांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.  कथा, पटकथा, दिग्दर्शन हर्षवर्धन यांचे असून पहिल्याच प्रयत्नात त्याने असा मोठा संवेदनशील विषय हाताळणे बऱ्याच अंशी साध्य केले आहे असे म्हणता येईल.  मनोज जोशीने एक संयत, विद्वान पुरोहित पंत साकारले आहेत. निरंजनला (आणि आपल्यालाही) पडलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देतात. देव या संकल्पनेवर प्रकाश पाडतात, हे त्यानी छान साकारले आहे. सौरभ, दीप्ती प्रमाणेच पुष्कराज चिरपुटकर, शुभंकर एकबोटे यांचाही ...

उडता पंजाब : दबलेला आतंक

पंजाबमधील ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या तरुण मंडळी, अमली पदार्थांची तस्करी, सध्याच्या पिढीलाच पोखरणारं नार्को पॉलिटिक्स या सगळ्यांचं चित्रण 'उडता पंजाब' सिनेमात पाहायला मिळतं. आपल्या गाण्यांतून नशा, हिंसा ग्लोरिफाय करणारा, स्वतःही ड्रग्जच्या आहारी गेलेला तरुण रॉकस्टार टॉमी सिंग (शाहिद कपूर) , ड्रग्ज माफियांच्या जाळ्यात अडकलेली एक बिहारी तरुणी कुमारी पिंकी (आलिया भट), अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या रुग्णांवर उपचार करणारी डॉक्टर प्रीत (करीना कपूर), आणि पोलीस अधिकारी सरताज (दिलजीत) ही उडता पंजाब ची प्रमुख पात्रं योगायोगाने, वेगवेगळ्या संदर्भाने एकत्र येतात. एकीकडे सरताज आणि प्रीत ड्रॅग रॅकेट व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आले आहेत हा एक ट्रॅक तर एकीकडे ऐन तरुणाईत ड्रग्जमुळे स्वतःची स्वप्ने पिचलेले टॉमी आणि पिंकी, यांचीबस्वतःची स्वतःशी लढाई हा एक ट्रॅक आहे. मधेच भ्रष्टाचारी सरकारी यंत्रणा आणि झिंगून भोगणारी तरुणाई असे ट्रॅक या सिनेमात येतात. चित्रपटातील अतिशिवराळ भाषेमुळे, काही बाबी अश्लील (म्हणजे नेमकं काय काय?🤔) भासल्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या अनेक 'कटकटिंग...

"आम्ही दोघी - एक धागा विणलेला"

काल 'आम्ही दोघी' पाहिला. गौरी देशपांडें च्या 'पाऊस आला मोठा' या कथेवर बेतलेला हा सिनेमा. दिग्दर्शिक प्रतिमा जोशी यांनी कथेवर सुंदर काम करून चित्रपट बनवला आहे. संवाद जास्त करून कथेतलेच असल्यामुळे भाग्यश्री जाधवला फारसे काही करावे लागलेच नाही असं म्हणणं गैर ठरेल. मूळ कथेत नसलेली पात्रे राम, नेहा व तिचा नवरा या कथेत अगदी सहज सामावून गेलेली आहेत. त्यांचे किंवा अम्मीचे शेवटचे संवाद कॅची, थोडके आणि तरीही हृदयस्पर्शी.  कोल्हापुरातील एक नामांकित वकील (किरण करमरकर) यांची मुलगी सावित्री सरदेसाई (प्रिया बापट). तिची आई लहानपणीच गेल्यामुळे, अप्पा (वडील) आणि घरातील नोकरचाकर यांच्या देखरेखी झालीच वाढलेली.  लहनपणापासून घरात "We are not emotional fools. We are practical." हे तिच्या वडिलांचं तत्व तिनेही जपलेलं. त्यामुळे काहीशी फटकळ, तुसडी किंवा चांगल्या शब्दात म्हणायचं तर 'अतिस्पष्ट'. इतर मुलींपेक्षा वेगळी सावित्री.  10वीत असताना अचानक एके दिवशी तिचे वडील तिच्यातून 7-8 वर्षांहून मोठ्या अमलाला (मुक्ता बर्वे) लग्न करून घरी घेऊन येतात. वरवर "मला काय कराय...

थ्री बिलबोर्डस आउटसाईड एबिंग, मिसोरी

मी सहसा मनाला अस्वस्थ करणारे चित्रपट पाहत नाही, पण काही दिवसांपूर्वी फिल्म सोसायटीने निवडलेला हा नावाजलेला सिनेमा पाहिला. कथा आहे मिल्डरेड या मध्यमवयीन स्त्रीची. तिच्या मुलीचा बलात्कार आणि खून होऊन अनेक महिने उलटूनही पोलीस तपासात काहीच निष्पन्न होत नाही. गुन्हेगार काही सापडत नाही. लोकही ही घटना विसरून जातात. याने पेटून उठून मिल्डरेड तिच्या गावातल्या एका रस्त्यावरचे 3 बिल्डबोर्डस भाड्याने घेते आणि प्रत्येकावर 'Raped while dying', इतके दिवस होऊन ही गुन्हेगार कसा सापडत नाही, असे पोलिसांचा नाकर्तेपणा समोर आणणारे अस्वस्थ प्रश्न एकामागोमाग एक लिहिलेले असतात. मिल्डरेड चा यामागे एकमेव हेतू असतो, आपल्या मुलीच्या गुन्हेगार सापडावा आणि त्याला शिक्षा व्हावी. साधारण सगळेजण एकमेकांना ओळखत असतात अशा लहानशा गावात काहीच लोक मिल्डरेडच्या बाजूने असतात पण बहुतेक जण नसतात, आणि त्यातही मीडिया आणि पोलीस यांना तीची ही न्याय मागण्याची पद्धत चुकीची आहे असं वाटत असतं. या सगळ्यांना तोंड देणारी एक शोकमग्न आई 'फ्रान्सिस मॅकडोरमंड' ने अप्रतिम साकारली आहे. तिच्या थंड चेहऱ्यामागे आहे एक धुम...

एक 'गुलाबजाम' मुरलेला

भारतातले अनेक पुरुष शेफ जगभरात विख्यात असले तरी, भारतात विशेषतः महाराष्ट्रात स्वयंपाक म्हणजे बाईचं काम हे समीकरण अजूनही घट्ट आहे. पण 'गुलाबजाम' चित्रपटाचा नायक आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा आपला लंडन मधली भरभक्कम पगाराची नोकरी सोडून भारतात परत येतो, पुण्यात खास मराठी पद्धतीचा स्वंयपाक शिकायला. लंडन मध्ये खास मराठी पदार्थांचं रेस्टॉरंट काढणं हे त्याचं स्वप्न आहे, ध्यास आहे. त्याला पुण्यातील एका डबे देणारी बाई राधा आगरकरचा (सोनाली कुलकर्णी) शोध लागतो आणि आता या राधाकडूनच आपल्याला स्वयंपाक शिकायचा आहे अशी खूणगाठ बांधतो, आणि तर्हेवाईक, खडूस, थंड  राधा जी स्वयंपाक मात्र चविष्ट बनवते तिला आपली गुरू मानून शिकवण्यासाठी तयार करतो, आणि आयुष्यच बदलून जातं! इतकीच कथा. कथा म्हंटलं तर इथेच संपली, पण खरं तर इथे सुरू होते सचिन कुंडलकर, तेजस मोडक यांची ही कथा मांडते मानवी जीवनाचे अनेक कंगोरे. भुकेसारखी सुंदर आणि वाईट ही,  कॉम्प्लेक्स गोष्ट नाही या जगात. तिच्या पूर्तीसाठी आपण जगतो. तिच्यामुळे आपण जगतो. ही कथा स्वयंपाकाची आहे, आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटकांची, वेगवेगळ्या परिमाणात घेऊन त्याल...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...