Skip to main content

Posts

सेक्रेड गेम्स सीजन - १

सरताज सिंग ( सैफ अली खान ) या प्रामाणिक पोलिसाला अचानक माफिया जगतातील खूप मोठ्या गँगस्टर गणेश गायतोंडे( नवाजुद्दीन ) कडून टीप मिळते, की काहीच दिवसात मुंबई संपेल. आणि सुरू होतो एक खेळ माफिया, पोलीस जगत, राजकारण, सेक्सवर्कर्स, धर्म, यांचा खेळ. अश्वत्थामा, हलाहल, ययाती असे एपिसोडस्. (त्यांची नावे तशी का आहेत हे बघायला नीट पाहायला लागेल. दिवस फ्री असेल तर Bingworthy आहेच)  नवाजुद्दीनने नेहमीप्रमाणे काम छान केलं आहे पण तो मराठी माणूस नाही वाटत. गायतोंडे नाही वाटत. बाकी त्याचं काम सुंदर. मराठी नसता तर अजून चांगला इफेक्ट आला असता. कुकू, बंटी अशी काही पात्रं महत्त्वाची आहेत. सैफ अली खानने त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी झेप इथे घेतली आहे. गिरीश कुलकर्णी, राधिका आपटे अशा मराठी लोकांसोबतच भाव खाऊन जातो तो जितेंद्र जोशीने साकारलेला (काटेकर). जीव ओतणारा प्राणी. आहा. अप्रतिम.  शिव्यांनी ओतप्रोत भरलेला, सेक्स, हिंसेने भरलेला. सेक्रेड गेम्स.  बॉलिवूडमध्ये किंवा नव्या पिढीच्या वेब सिरीज जगतात क्रिमिनल वर्ल्ड हे अगदी रोजची उठण्याची - बसण्याची जागा अशी रंगवलेली आहे. एकदम...
कोल्हापूरचा महापूर नको नको ते राहून गेले हवे हवे ते, वाहून गेले पूरात उरल्या सुरलेल्यांना सैतानच मग पाहून गेले ढग फुटले नि कोसळला रात्रंदिवस धो धो ढळला किंकाळ्या मूक प्रेतांच्या ऐकून, पाहून तळमळला गुरे-ढोरे, जमिनी घरकुल आणि फुटके-तुटकेसे पूल जीव वाचूनही सारे गेले जसे एखादे कुस्करले फूल म्हणे 'कलयुग' आले कोणी कुणी सांगी भविष्य वाणी मला फक्त दिसत राहते भयाण पावसाचे पाणी आले उठून हात मदतीचे दिवस-रात देण्या साथीचे कोण-कुणाचे नाही तरीही 'आपला' या एका नात्याचे एकमेकांपासून होते दूर जोडी त्यांना हा  महापूर मदतीला जे पुढे धावते ते कोल्हापूर, ते कोल्हापूर  - ©रमा PC-The Hindu

मेरी यादमें तुम ना आंसू बहाना...

25 जून 1924 ला मदन मोहन कोहली यांचा जन्म इराणी कुर्दीस्तान येथे झाला. त्यांचे वडील बहादूर चुनीलाल तिथे अकाऊंट जनरल म्हणून काम करत. लहान वयातही मदनमोहन यांना गाण्याचा भलता शौक होता. आणि वडिलांच्या रेकॉर्ड कलेक्शन मधील कुठलेही गाणे स्वतः काढून ऐकण्याचा छंद ते अति लहानपणी सुद्धा कधीही पुरा करू शकत होते. त्यांना लाहोर ला त्यांच्या आजोबा हकीम योगराज यांच्याजवळ ठेवून त्यांचे कुटुंब मुंबईला स्थायिक झाले. लाहोर ला शालेय शिक्षणासोबतच त्यांनी थोडे शास्त्रीय संगीत शिक्षण स्थानिक शिक्षकांकडे घेतले. भारतात आल्यावर वडिलांच्या इच्छेखातर 1943 मध्ये मदन मोहन आर्मीत रुजू झाले. पण त्यांचे पहिले प्रेम संगीत. त्यामुळे त्यांनी वडीलांच्या अनिच्छेने देखील आर्मी सोडली आणि 1947 मध्ये ऑल इंडिया रेडिओ, लखनौ येथे प्रोग्रॅम असिस्टंट म्हणून काम पाहू लागले. काही कार्यक्रमांच्या प्रसारणाचे संगीतही त्यांनी दिले. संगीतातील दिग्गज कलाकारांचा, कार्यक्रम आणि प्रसारण यासाठी त्यांना प्रदीर्घ सहवास वेळोवेळी मिळाला. त्यांचे खरे शास्त्रीय संगीत शिक्षण सुरू झाले ते इथेच. तराण्यांची राणी जद्दन बाई (भारतातील मोजक्या महिला...

रिंगण! सुटता तुटेना माऊली..

रिंगण! आज घरातल्या देव्हाऱ्यात एकलाच उभा पांडुरंग बघून मकरंद माने दिग्दर्शित 'रिंगण' ची आठवण आली. अर्जुन मगर (शशांक शेंडे) आणि त्याचा मुलगा अभिमन्यू (साहील जोशी) या बापलेकाची कथा.  दुष्काळाने कर्जाच्या ओझ्यात पिचलेला शेतकरी, त्यात गहाण गेलेली जमीन. आत्महत्येचे सततचे विचार झटकून, पोरासोबत पंढरपूराला जातो. पोराची आई देवाच्या गावाला गेली असं सांगितल्यामुळे, इथे माझी आई सापडेल अशी आशा घेऊन आलेला 7-8 वर्षाचा त्याचा मुलगा. निराशेतून आत्मविश्वासाने, श्रद्धेने सकारात्मक मार्ग दाखवणारा 'रिंगण'.  बापलेकाचे नाजूक नाते, पापभिरू निष्पाप अर्जुन मगर आणि त्याचा निरागस मुलगा अभिमन्यू पंढरीच्या गावी तरी काही पदरी पडेल का अशी आशा करत आलेले असतात त्यांची कथा. पंढरपूरला वारीला रिंगण सोहळे असतात त्यामुळे तर हे नाव साजेसे आहेच पण आपण ज्याला चमत्काराच्या अपेक्षेने शोधत फिरतो, तो कुठे ना कुठं आपल्या सोबत निरनिराळ्या रूपात सकारात्मकता देऊन जातो. आपल्या मातीशी सुरू झालेला प्रवास पुन्हा आपल्या मातीशी नेऊन पोहोचवतो असे रिंगण. आपल्याजवळ जे नाही त्या पळत्याच्या पाठी धावता आपण हातचं स...

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां...

'भाई : व्यक्ती की वल्ली' - आकाश व्यापणारी असामी

पुलंचं बायोपिक म्हणजे अक्षरशः अशक्य वाटलं होतं. पण  टीजर आवडला आणि काहीही झालं तरी बघायला जायचं हे ठरवलंच होतं.  घरी पु.लविषयक काहीही म्हणजे 'घरचं कार्य', त्यामुळे खोकला, कणकण,  निर्माता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे सगळे प्रॉब्लेम असूनही फर्स्ट डे फर्स्ट शो ला गेलेच. आणि सोबतीला मंडळीही तगडी. सगळ्यांनी भाई, भाईकाका जवळून पाहिलेले, अनुभवलेले अशी माणसं सोबत घेऊन सिनेमा पाहिला. एखादा माणूस आवडता कलाकार किंवा पब्लिक फिगर म्हणूनच नाही तर जिव्हाळ्याचा विषय म्हणून त्याच्यावरील चित्रपट पाहण्यासाठी आले खरंतर. चित्रपटाचं कास्टिंग चांगलं झालं आहे. सागर देशमुखचा खरेखुरे पु.ल साकारण्याचा प्रयत्न अगदीच कौतुकास्पद आहे. अगदीच कमाल. तसेच इरावती हर्षेनी तरुणपणीच्या सुनीताबाईंच्या भूमिकेत अप्रतिम काम केले आहे. पुलंचं बालपण ते तरुणपण या चित्रपटात उलगडून दाखवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. त्यांची वैविध्यपूर्ण शैली, भाषेवरचं प्रभुत्व, निकोप, मार्मिक विनोद याचा प्रत्यय पावलोपावली येतो. यातले सगळे प्रसंग आधी लिखित, ऐकीव स्वरूपात असूनही कंटाळा असा कुठे येत नाहीत. पुलंचे विनोद, कि...

हम आज कही दिल खो बैठे....दिलीप साब आपको..

'स्टारडम' ही संकल्पना क्षणिक असणाऱ्या काळातही दिलीपकुमार हा एक दुर्मिळ अभिनेता आहे जो मनोरंजन क्षेत्रात 58 वर्षानंतरही तंबू ठोकून उभा राहिला. दिलीपकुमारने सहा दशकाच्या कारकिर्दीत केवळ 56 चित्रपट केले. पण प्रेक्षकांसोबत लगेच संवाद साधण्याचं अलौकिक वरदान त्याला लाभलेलं होतं, ज्याने त्याला हिंदी सिनेमात अनेक क्लासिक्स देता आले. पेशावरहून पळून आलेला , पुण्यातील एका मिलिटरी कँटीन मध्ये काम करत करत फळांच्या दुकानाचा मालक बनलेला युसूफ खान. त्याच्यातला अभिनेता जागा होऊन त्याची अभिव्यक्ती युसूफ खानला मुंबईला घेऊन आली.  बॉम्बे टॉकीजची महत्त्वाची नियंत्रक देविका राणी, अशोककुमार नंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी कोणा प्रतिभावंताच्या शोधात होती. युसुफच्या गुणवत्तेवर प्रसन्न होऊन त्याला 'ज्वार भाटा' मध्ये हिरो म्हणून ब्रेक मिळाला.  देविका राणीने अत्यंत कडक शिस्तीने आणि कठोर शासनाने स्टुडिओ वर पकड ठेवली होती.  अभ्यासण्यासाठी भरपूर सामान आणि सृजनशील वातावरणाने या गुणी कलाकाराला  पाया मजबूत करता आला, ज्याने त्याच्यातला उत्कृष्ट अभिनेता बाहेर आला जो आज एक लेजंड आहे. न...