डोळे उघडत होते हळू-हळू..वेगळाच प्रकाश दिसत होता लांबून..खूप सुंदर अनुभव घेतला होता मी..मला देव भेटला होता. I.C.U. बाहेरचा तो लांबच लांब कॉरीडोर..भकास..शांत..दोन-तिन बाकडी टाकलेली त्या तिथे..एका स्ट्रेचरवर मी झोपलेली वाट बघत..समोर स्पेशल रूम नं. १ दिसतेय. इतका अविस्मरणिय अनुभव घेऊन मी कधी एकदा आईला भेटेन असं झालेलं मला आणि मला इथेच का ठेवलय? इतकं काय खास झालं होतं?? मला देव भेटला होता. I.C.U. मधून काढून रूम मध्ये न्यायला इतका का वेळ? माझी चिडचिड व्हायला लागलेली..स्ट्रेचरवर पडल्या-पडल्या मी इकडे-तिकडे बघतेय..शेजारच्या त्या बाकावर एक बाई बसलेली.. कमालीचा ओळखीचा वाटतो नाही का चेहरा हिचा? अगदी शांत, सौम्य वगैरे..वात्सल्याला मूर्त रूप दिलं तर अगदी अशीच दिसेल. मी उगीचच बघतेय का हिच्याकडे केव्हाची? का ही टक लाऊन बसलीआहे माझ्याकडे? बोलावं का काही? हिचं कोणी अॅडमिट असेल का इथे? नक्कीच बरं झालेलं असेल. इतकी शांत, समाधानी दिसती आहे..की डॉक्टर असेल? पण कपडे तर डॉक्टरचे वाटत नाहीत.. अचानक तिच बोलायला लागते, "बरं वाटंतय का आता?" किती शांत आणि आपुलकीचा आवाज आहे हिचा.. मी - ...
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..