कान्हाच्या या अनेक गोपी
तरी वाटते राधा प्यारी
प्रेम सखी ती, प्राण सखी ती
राधा, राधा, राधा न्यारी
रंग रंगतो, खेळ खेळतो
राधेला या छेड छेडतो
रंगुनी साऱ्या क्रीडांमधूनी
परी असे ही श्वेत बावरी
राधेने त्या चंग बांधला
छळतो मजला श्याम सावळा
पाहतेच मी कसा राहतो
माझ्याविन तो गोपमुरारी
राधेवाचून कसल्या क्रीडा
कसले गोकूळ, मनभर पीडा
करमेना जीव कृष्णाचा हा
राधेचाही प्राण उरावरी
राधे सखये कृष्ण आळवी
म्हणतो राधा, राधा प्यारी
प्रेम सखी ती, प्राण सखी ती
राधा, राधा, राधा प्यारी
तरी वाटते राधा प्यारी
प्रेम सखी ती, प्राण सखी ती
राधा, राधा, राधा न्यारी
रंग रंगतो, खेळ खेळतो
राधेला या छेड छेडतो
रंगुनी साऱ्या क्रीडांमधूनी
परी असे ही श्वेत बावरी
राधेने त्या चंग बांधला
छळतो मजला श्याम सावळा
पाहतेच मी कसा राहतो
माझ्याविन तो गोपमुरारी
राधेवाचून कसल्या क्रीडा
कसले गोकूळ, मनभर पीडा
करमेना जीव कृष्णाचा हा
राधेचाही प्राण उरावरी
राधे सखये कृष्ण आळवी
म्हणतो राधा, राधा प्यारी
प्रेम सखी ती, प्राण सखी ती
राधा, राधा, राधा प्यारी
Comments
कृष्ण सख्याला घालुनी साद
म्हणे कधी तू येशील इथवरी
प्रिय राधेच्या राधानगरी....
तुझी कविता वाचता वाचता सहजच सुचलं म्हणून लिहिलं....छान लिहितेयस....!