Skip to main content

Posts

अंधाधून:- A Trilling Blind Game

अंधाधून:- हवीहवीशी अंदाधुंदी आत्ता अंधाधून बघून आले..  नाटकाचा एक साधा नियम आहे. पहिल्या अंकात जर भिंतीवर बंदूक दाखवली, तर तिसऱ्या अंकात तिचा बार उडलाच पाहिजे. नाहीतर ती दखवण्याचं प्रयोजन काय? (*Bertolt Brecht, Chekhov and others) एका लाईन मध्ये अंधाधूनची कथा सांगायची तर, एक तरुण प्रतिभावान 'अंध' पियानो आर्टिस्ट एक खून 'पाहतो'. आणि मग सुरू होते थरारक घटनांची मालिका. एक थ्रिलर असूनही दिग्दर्शक 'श्रीराम राघवन' यांनी बुफे सारखं, कुणाचा खून झाला, कुणी केला, कसा केला, का केला? सगळं वाढून ठेवलं आहे. काहीही प्रेक्षकांपासून लपलेलं नाही. आणि तरीही अत्यंत अनपेक्षित, वेगवान, उत्कंठावर्धक हे रहस्यपटाचे सारे गुण आपल्याला अनुभवायला मिळतात.  गुणी कलाकार आयुषमान खुराना याने त्याची versatility इथेही जपली आहे, राधिका आपटे तिच्या नेहमीच्या बिनधास्त अवतारात आहे. छाया कदम( सैराट, न्यूड फेम), अश्विनी काळसेकर, मानव वीजे, अनिल धवन लहान लहान भूमिकांत भाव खाऊन जातात. एकदम नैसर्गिक.  आणि तब्बू.. एक नंबर..Cold blooded, जहरी, दुटप्पी आणि चित्रपटात एक पात्र म्हणतं त्याप्र...

होम स्वीट होम - नात्यांचं रूटीन चेकप

साठी पार जोडप्यातल्या सौ.श्यामलला (रिमा लागू),आहे तो फ्लॅट विकून टॉवरमध्ये राहायला जायचे आहे, तर श्री. विद्याधरांसाठी(मोहन जोशी)आपल्या घर म्हणजे नुसत्या भिंती नाहीत. आठवणींचा साठा आहे, आयुष्याचा असा भाग आहे की, उर्वरित आयुष्यही इथेच घालवावं अशा मताचे. त्यातून त्यांना नवं घर मिळवून, आपल्या घरासाठी स्वप्न पाहणारा देणारा एजंट (हृषीकेश जोशी) यांची ही कथा. त्यापायी होणारे रुसवे फुगवे, भौतिकाशी आपलं जडलेलं अतूट नातं, एकीकडे नव्याची आस आणि दुसरीकडे न सुटणारी जुन्याची कास आहे. या मुख्य पात्रांसोबतच विभावरी देशपांडे, स्पृहा, सुमित राघवन त्यांच्या त्यांच्या लहानशा भूमिकेत चांगले वाटतात.  राहत्या घराचा कंटाळा येऊन दुसरं घर पाहायला गेलेले महाजन जोडपं घरी येऊन स्पृहाच्या मित्रमंडळींचा पार्टीनामक पसारा पाहतं, तेव्हा "माझ्या घरात मलाअसली थेरं चालणार नाहीत" म्हणणारी श्यामल आपल्या घराबद्दल भावुक होते.. आणि शेवटी फ्लॅट असो की टॉवर शेवटी त्यात राहणाऱ्या माणसांनी घर बनतं. म्हणजे एकीकडे तिला दुसरं चांगलं घरही हवं आहे, तर दुसरीकडे जुन्या घराची ओढही कमी होत नाही आहे. 'इच्छा आणि आवश्यकता...

सविता दामोदर परांजपे - एक रंगलेले गूढ

लग्नाच्या 8 वर्षानंतरही वरून सुखवस्तू जोडपे शरद व कुसुम अभ्यंकर(सुबोध भावे, तृप्ती तोरडमल) सुखी नाही. कुसुम एका विचित्र शारीरिक, मानसिक स्थितीतून जाऊ लागते ज्याचे वैद्यकशास्त्रात उत्तर नाही. याचा तिच्या वैवाहिक आयुष्यावर होणारा परिणाम, भूतकाळात डोकावून बघताना उलगडलेले एक सत्य, एक स्त्री. 'सविता दामोदर परांजपे'. कोण आहे ही सविता? तिचं आणि शरदचं नातं काय?  या साऱ्याची ही कथा. 80 च्या दशकातल्या याच नावाच्या मूळ नाटकावर बेतलेला हा सिनेमा आहे. नाटकात कै. रीमा लागू यांनी केलेली कुसुमची भूमिका तृप्ती तोरडमल हिने साकारली आहे. तिचे हे यशस्वी पदार्पण म्हणावे लागेल. सुबोध भावेने ही शरदची भूमिका उत्तम वठवली आहे. बाकी भूमिकांमध्ये राकेश बापट, पल्लवी पाटील यांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे.  चित्रपटातील गाणी आणि बॅकग्राऊंड साऊंड खूप मस्त. 'वेल्हाळा' आणि 'जादूनगरी' ही गाणी खूपच श्रवणीय. संवादही सुंदर. मराठी भयापटांचा इतिहास पाहता, एक थरार निर्माण करून तो शेवटपर्यंत राखून ठेवण्याचे काम यात चांगल्या रीतीने केले आहे. काहीशी हिंदी चित्रपट 'भूलभुलैय्या' ची झा...

ब्रिजमोहन अमर रहे: बलमा ये करमा

एक साधारण माणूस ब्रिजमोहन (अर्जून माथूर) कर्जाच्या बोझ्याने परेशान आणि जीव मुठीत घेऊन असताना हतबल होऊन स्वतःच्याच मृत्यूचा देखावा रचतो, पण स्वतःच्याच खुनाबद्दल त्याला शिक्षा ठोठावल्या जाण्यापर्यंत गोष्टी हाताबाहेर जायला लागतात. आणि तो एका संकटातून बाहेर पडतो न पडतो तो अजून वेगळ्या संकटात फसायला लागतो. अशी एकंदर 'ब्रिजमोहन अमर रहे' ची मनोरंजक  संकल्पना आहे. कलाकारही चांगले आहेत. अधूनमधून रटाळ व्हायला लागतंय असं वाटतं तोच परत पेस वाढते.  शिव्या, अनैतिक संबंध आणि सेक्स शिवाय नेटफ्लिक्स ओरिजिनल येतच नाहीत जणू. छान ब्लॅक कॉमेडी चालू असताना अचानक  कसलातरी विनाकारण अश्लील छपरीपणा सगळं फिस्कटून टाकतो.  "मनुष्याला शेवटी आपल्या कर्माची फळं भोगावीच लागतात" हा संदेश यात दिला आहे. नेटफ्लिक्स फिल्मसची जमेची बाजू म्हणजे गोष्ट कोणत्याही कॅरेक्टरला ग्लोरिफाय केलेलं नसतं. पण या सिनेमात प्रत्येक पात्राची ब्लॅक साईड हायलाईट केलेली आहे. आणि त्याची आपल्याला सवय नाही.  जबरदस्त पंची डायलॉग्ज, जुन्या गाण्यांचा चपखल ठिकाणी वापर याने काही ठिकाणी मजा येते. या कल्पनेवर अ...

एक ही भूल..स्लो स्लो घूल

Tv मालिकांना कंटाळून पुन्हा पाऊले चालती नेटफ्लिक्सची वाट करत आज मी नेटफ्लिक्स वरची नवीन वेब सीरिज 'घूल' पाहिली. ते काय आहे, मला हॉरर प्रकार आवडतो आणि नेटफ्लिक्सने दत्तक घेतलेली राधिका आपटेही. अरबी लोककथेनुसार 'घूल' हे असे भूत असतात जे माणसांना खातात आणि मग त्यांचे रूप धारण करतात.  3 एपिसोडमध्ये याचा पहिला सीझन शूट केलेला आहे. साधारण हॉररपटांमध्ये होणारा धक्कातंत्राचा वापर इथे खूपच कमी आहे. त्यामुळे इथे घाबरण्यासाठी पाहणाऱ्या प्रेक्षकांना काही सस्पेन्स वगैरे मिळतच नाही.   काही ठिकाणी अक्षरशः बोर व्हायला झाले. ज्यांना इंग्रजी हॉररपट बघायची सवय आहे त्यांना फार काही वेगळा वाटणार नाही. पण राजकीय पार्श्वभूमी, गुप्त एजन्सी, मुस्लिमाना आतंकवादी लेबल लावून केलेले इंटेरोगेशन, देशभक्ती आणि धर्म अशा महत्त्वाच्या विषयातील काही clichés इथे आढळतील.  Sacred Games शी याची तुलना होऊच शकत नाही. त्यात छोट्याशा भूमिकेतही भाव खाऊन गेलेली राधिका आपटे यात निदाच्या भूमिकेत predictable वाटायला लागते.  पण तरीही it's worth a try. काळा, पांढरा, ग्रे शिवाय पुढच्या स...

लिपस्टिक अंडर माय बुरखा : फिस्कटलेली रंगीत स्वप्ने

आज बहुचर्चित 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' पाहिला. (सौजन्य-Netflix) एक हवाई मंजिल नामक पुरानी हवेली त्यातल्या 4 स्त्रियांची ही कहाणी. यांनी अपराध केला आहे. स्वप्नं पाहण्याचा. आपल्या मर्जीने आयुष्य जगण्याची स्वप्नं, स्वतःच्या शरीरावर प्रेम करण्याची स्वप्नं. कर्मठ कुटुंबाच्या कचाट्यापासून ते सेक्सिस्ट, दांभिक समाजाच्या so called मूल्यांशी झगडून स्वातंत्र्य मिळवण्याची स्वप्नं. त्यांना ती स्वप्नं पाहण्याचा अधिकार आहे तो एका उंबऱ्या आडूनच. लिपस्टिक च्या लाखो शेड्स सारखी रंगीत स्वप्नं असतील. पण ती लपवायची. त्यांना लपूनछपून रहायची परवनगी आहे. पण बुरख्याआड. भोपाळ सारख्या ठिकाणी असलेल्या या बायका. रेहाना ही कॉलेज कन्या. तिच्याघरीच बुरखा शिवण्याचा व्यवसाय आहे. पण रॉकस्टार बनावं, बेधुंद नाचावं, गावं, जीन्स सारखा पेहनावा करावा असं तिला वाटतं. सनातनी मुस्लिम कुटुंबातील बंधनांना झुगारुन, पारतंत्र्याच्या बुरखा फाडून तिला मोकळं व्हायचंय.  दुसरी लीला. बळजबरीने लग्न लावले जाणारी एक तरुणी, प्रियकर आणि होणारा नवरा यांच्या कात्रीत सापडलेली, बिझनेस करावा, दिल्ली गाठावी अशी तिची ...

लस्ट स्टोरीज: कथा चार, अनंत विचार

'बॉम्बे टॉकीज' या अँथॉलॉजि फिल्म नंतर त्याच दिग्दर्शकांनी पुन्हा एकदा एका थीम वर आधारित चार गोष्टींची मालिका आणण्याचा प्रयोग 'लस्ट स्टोरीज' च्या चार कथांमध्ये केला आहे. ज्यांना ज्यांना सांगितलं "पाहा जरूर", almost सगळ्यांच्या akward reactions आल्या. ( की बाई, तुला काही भीड, मुरवत आहे की नाही, हळू सांग की, या विषयावर अशी बोंबलतेस काय?) आणि काय सांगू, हीच थीम आहे. 'लस्ट स्टोरीज' केवळ 'शारीरिक वासना' इतकाच विषय नाही हाताळत. सेक्स, गरज, सामाजिक दृष्टिकोन आणि taboos, व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्त्री..  एकंदर या सगळ्यावर आधारित आहेत लस्ट स्टोरीज.  पहिली कथा अनुराग कश्यपची. राधिका आपटेने खाऊन टाकली आहे. लग्न झालेल्या बाईचे कलीग सोबत विद्यार्थ्यांसोबत fling. त्यातून होणारी सेक्स, रिलेशनशिप, प्रेम , गिल्ट, जेलसी यांची सरमिसळ सगळं सगळं ती आपल्यासोबत शेअर करते. नेहमीप्रमाणे प्रामाणिक अभिनय, कसलाही भपका नाही. 'Bold & Beautiful yet Confused' कालिंदी तिने मस्त रंगवलीये. आकाश ठोसर ला चांगली संधी मिळाली आहे, पण त्याने त्याच्या बोलण्यावर अजून क...