Skip to main content

Posts

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां...

'भाई : व्यक्ती की वल्ली' - आकाश व्यापणारी असामी

पुलंचं बायोपिक म्हणजे अक्षरशः अशक्य वाटलं होतं. पण  टीजर आवडला आणि काहीही झालं तरी बघायला जायचं हे ठरवलंच होतं.  घरी पु.लविषयक काहीही म्हणजे 'घरचं कार्य', त्यामुळे खोकला, कणकण,  निर्माता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे सगळे प्रॉब्लेम असूनही फर्स्ट डे फर्स्ट शो ला गेलेच. आणि सोबतीला मंडळीही तगडी. सगळ्यांनी भाई, भाईकाका जवळून पाहिलेले, अनुभवलेले अशी माणसं सोबत घेऊन सिनेमा पाहिला. एखादा माणूस आवडता कलाकार किंवा पब्लिक फिगर म्हणूनच नाही तर जिव्हाळ्याचा विषय म्हणून त्याच्यावरील चित्रपट पाहण्यासाठी आले खरंतर. चित्रपटाचं कास्टिंग चांगलं झालं आहे. सागर देशमुखचा खरेखुरे पु.ल साकारण्याचा प्रयत्न अगदीच कौतुकास्पद आहे. अगदीच कमाल. तसेच इरावती हर्षेनी तरुणपणीच्या सुनीताबाईंच्या भूमिकेत अप्रतिम काम केले आहे. पुलंचं बालपण ते तरुणपण या चित्रपटात उलगडून दाखवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. त्यांची वैविध्यपूर्ण शैली, भाषेवरचं प्रभुत्व, निकोप, मार्मिक विनोद याचा प्रत्यय पावलोपावली येतो. यातले सगळे प्रसंग आधी लिखित, ऐकीव स्वरूपात असूनही कंटाळा असा कुठे येत नाहीत. पुलंचे विनोद, कि...

हम आज कही दिल खो बैठे....दिलीप साब आपको..

'स्टारडम' ही संकल्पना क्षणिक असणाऱ्या काळातही दिलीपकुमार हा एक दुर्मिळ अभिनेता आहे जो मनोरंजन क्षेत्रात 58 वर्षानंतरही तंबू ठोकून उभा राहिला. दिलीपकुमारने सहा दशकाच्या कारकिर्दीत केवळ 56 चित्रपट केले. पण प्रेक्षकांसोबत लगेच संवाद साधण्याचं अलौकिक वरदान त्याला लाभलेलं होतं, ज्याने त्याला हिंदी सिनेमात अनेक क्लासिक्स देता आले. पेशावरहून पळून आलेला , पुण्यातील एका मिलिटरी कँटीन मध्ये काम करत करत फळांच्या दुकानाचा मालक बनलेला युसूफ खान. त्याच्यातला अभिनेता जागा होऊन त्याची अभिव्यक्ती युसूफ खानला मुंबईला घेऊन आली.  बॉम्बे टॉकीजची महत्त्वाची नियंत्रक देविका राणी, अशोककुमार नंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी कोणा प्रतिभावंताच्या शोधात होती. युसुफच्या गुणवत्तेवर प्रसन्न होऊन त्याला 'ज्वार भाटा' मध्ये हिरो म्हणून ब्रेक मिळाला.  देविका राणीने अत्यंत कडक शिस्तीने आणि कठोर शासनाने स्टुडिओ वर पकड ठेवली होती.  अभ्यासण्यासाठी भरपूर सामान आणि सृजनशील वातावरणाने या गुणी कलाकाराला  पाया मजबूत करता आला, ज्याने त्याच्यातला उत्कृष्ट अभिनेता बाहेर आला जो आज एक लेजंड आहे. न...

वो जिंदगी का साथ निभाता चला गया....

3 डिसेंम्बर 2011, लंडनमधील उच्चवर्गीय भाग मेफेअर येथील वॉशिंग्टन हॉटेल मध्ये अचानक गोंधळ सुरू झाला. बाहेर दोन अँब्युलन्स आल्या. दोन पॅरामेडिक्स लगबगीने हॉटेल लॉबीत पोहोचले. रिसेप्शनिस्ट ओरडले "रूम 207". पॅरामेडिक त्यांची प्रथमोपचार साधने घेऊन लिफ्टकडे धावले. पण 207 मध्ये सारं काही संपलं होतं. सुप्रसिद्ध नायक देव आनंद यांचा हृदयविकाराचा मोठा झटका येऊन अंत झाला.  देव आनंद हा वर्तमानात जगणारा माणूस होता, पण त्याला भविष्याकडे पाहून काम करणं  चांगलंच ठाऊक होतं. . वयाची ऐंशी पार केल्यानंतरही, यश मिळो किंवा अपयश, टीका असो किंवा शेवटच्या काळात त्याची खिल्ली उडवलेली असो त्याचा वेळ, ऊर्जा आणि कल नवनवीन चित्रपट बनवण्यासाठी होता. या दुर्दम्य महत्वाकांक्षी व्यक्तिमत्त्वाला 'अशक्य' शब्दच जणू माहीत नव्हता. तो होता ख़ुशमिज़ाज, परिपूर्ण, देखणा.. देव आनंद!  देव आनंदच्या करिअरची विभागणी साधारणपणे अशी करता येईल- त्याचा 'कृष्णधवल काळ' जिथे त्याच्या बहुतेक दिग्दर्शकांनी (जास्त करून त्याचा भाऊ-विजय आनंद) त्याच्या अति टोकाला जायच्या प्रवृत्तीला काबूत ठेवलं होतं, आणि ...

सलील चौधरी : एक श्रद्धांजली

बंगाल प्रांत हा मुळातच मुग्ध करणारा प्रदेश आहे. कलाप्रेमींवर तर बंगालची कायमच जादू राहिली आहे. के एल सेहगल पासून अनिल बिस्वास, एस डी, आर डी, हेमंतकुमार, किशोरकुमार, मन्ना डे ते लोकगीतं गाणारे कुणी अनामिक, इथलं संगीत अत्यंत मधुर, मोहक संगीत आहे. या सर्वांतच मला 'सलील चौधरी' या संगीतकाराने नेहमीच मोहवून टाकलं आहे. आज सलील चौधरी यांचा जन्मदिवस. सुरुवात झाली 'मधुमतीने'. एकूण 12 गाण्यांचं अप्रतिम प्रदर्शन. मुकेशची तरल "दिल तडप तडप" आणि "सुहाना सफर और ये मौसम हसीं", एकीकडे लताची आर्त हाक  "आजा रे परदेसी", खेळकर "घडी घडी मोरा दिल धडके" आणि "जुल्मी संग आँख लडी" तर दुसरीकडे मोहम्मद रफीची "टुटे हुए ख्वाबोंने" ते "जंगलमे मोर नाचा" अशी बहुरंगी गाणी. "दैय्या रे, दैय्या रे चढ गयो पापी बिछुआ" गाण्याप्रमाणे  लहानपणापासूनच सलीलदांनी मला झपाटून टाकलं. आणि फिल्मी गीतांच्या जादुई दुनियेत मी प्रवेश केला. मुकेशने सलीलदांच्या निर्देशनखाली ज्याप्रमाणे गायले आहे ते खरंच उल्लेखनीय आहे. अगदी ...

आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर : एकदम कडक!!

व्यवसायाने प्रथितयश डेंटिस्ट पण, रक्तात अभिनयाची ओढ असलेला एक गोरा, घारा तरुण. केवळ एक प्रॉम्पटर म्हणून रंगभूमीशी नातं ते मराठी रंगभूमीचा पहिला-वहिला सुपरस्टार, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतले मोठे स्थित्यंतर, एक टप्पा असा सगळा प्रवास असलेले डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावरील बायोपिक. सुबोध भावे पुन्हा एकदा बायोपिकमध्ये म्हंटल्यावर मला आधी शंका होती. पण यावेळीही सुबोधने बाजी मारलीच आहे.  एका 'सुपरस्टार' चा उदय ते अंत त्याने खडतर प्रयत्नांनंतर लीलया साकारले आहे. सुबोध भावे मूलतः अतिशय अंतर्मुख माणूस आहे, त्याने साकारलेल्या भूमिकेच्या अगदी उलट. घाणेकरांच्या व्यक्तिमत्वाचा त्याने अंतर्बाह्य अभ्यास केलेला आहे हे अगदी जाणवतं. आमच्या पिढीला डॉक्टरांचे दर्शन फारसे घडले नाही (पाठलाग आणि गोमू संगतीने सोडून) पण सुबोध भावेनी ते घडवून आणले आहे. चित्रपटाच्या इतर कास्टिंगबद्दलही मला शंका होती पण सुलोचना दीदीं च्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी असो किंवा प्रसाद ओकचा प्रभाकर पणशीकर असो, त्यांनी चांगले बेअरिंग पकडले आहे.  एक स्वकेंद्री, बेदरकार, फटकळ, व्यसनी, विक्षिप्त, लफडेबाज, चाहत्यांच...

बधाई हो: मज्जेदार, लज्जतदार कॉमेडी

बधाई हो: मज्जेदार, लज्जतदार कॉमेडी कौशिक कुटुंब, मध्यमवयीन जोडपं, त्यांना एक तरुण मुलगा लग्नाला आलेला, तर दुसरा किशोरवयीन मुलगा, आणि आज्जी, हे दिल्लीतले एक सामान्य कटुंब. एखाद्या बाळाचं येणं एखाद्या कुटूंबासाठी किती आनंदाची गोष्ट असते. येणाऱ्या नव्या पाहुण्यासाठी सारे अगदी सज्ज असतात. पण कौशिक कुटुंबावर बॉम्ब पडतो जेव्हा 50शी उलटलेलं आलेलं जोडपं जितेंदर (गजराज राव) आणि प्रियंवदा (नीना गुप्ता) यांना नवीन बाळाची चाहूल लागते. या ' Good news' कडे घरातल्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया, शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या प्रतिक्रिया, प्रत्येकाचे वेगळे दृष्टिकोन या सगळ्या ची ही गोष्ट आहे. अमित शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  नकुल (आयुषमान खुराना) हा कौशिकांचा मोठा मुलगा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर, प्रेमजीवनावर याचा होणारा परिणाम हे जरी कथानक असले तरी ते सेकंडरी म्हणावे लागेल. खरी कथा आहे, तिसऱ्यांदा मूल होणाऱ्या, तेही 50शी उलटलेल्या, अशा जोडप्याची. गजराज आणि नीना यांचा अभिनय जबरदस्त आहे. गजराज राव यांना तर काही सीन्स मध्ये संवाद नसूनही केवळ हावभावांवरून...