Skip to main content

Posts

Showing posts from 2017

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

स्मृतिगंध लिसनर्स क्लब - वर्धापन दिन (२०१७)

कोल्हापुरातील संगीत रसिकांसाठी गाणी आणि आठवणी यांचा खजिना उलगडणाऱ्या 'स्मृतिगंध लिसनर्स क्लबचा' १७ वा वर्धापन दिन काल झाला. प्रा.श्रीकृष्ण कालगावकर, श्री.धनंजय कुरणे आणि श्री.प्रभाकर तांबट या कोल्हापुरातील अभ्यासू संगीतप्रेमींनी, रसिकांसाठी चालू केलेला हा क्लब. जुन्या व सुरस गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकण्याआधी गाण्यातील सौंदर्यस्थळे समजावून घेऊन नंतर ते गाणे ऐकवतात. त्यामुळे या गाण्यांचा आस्वाद अधिक चांगल्या पद्धतीने घेता येतो या कार्यक्रमात. संगीतावरील निस्सीम प्रेम आणि अभ्यास हाच या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वाद्य सनई वादनाने झाली. प्रसिद्ध सनईवादक शंकरराव गायकवाड यांनी वाजवलेले मानापमान नाटकातील 'चंद्रिका ही जणू' हे पद ऐकवले. कर्नाटक संगीत शैलीचा त्यावर प्रभाव त्यांनी स्पष्ट केला.  यानंतरचे गीत होते चित्रपट 'शारदा' मधील हंसध्वनी या रागातील गीत 'ओ चाँद जहाँ वो जाए' हे गीत. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी हे ऐकलेलं हे गीत मीनाकुमारी आणि श्यामा यांच्यावर चित्रित झालेलं. लता व आशा त्या काळात एकमेकांशी बोल...

अपूर्व प्रकाशवाटा

आज एका अलौकिक, कल्पनातीत कलाकृतीचा आस्वाद घ्यायला मिळाला. महाकवी, कविकुलगुरू कालिदास यांची महान कलाकृती 'मेघदूत' आजवर अनेकांनी बसवलेली आहे, पण आजचा प्रयोग नावाप्रमाणेच 'अपूर्व मेघदूत' होता. एक अद्भुत नाट्यप्रयोग. द्रुष्टीक्षीणतेपासून, दृष्टिहीनतेपर्यंत अंधत्त्वाचे भिन्न प्रकार असलेले १९ प्रतिभाशाली अंध कलाकारांनी सादर केलेला नाट्यप्रयोग. गणेश दिघे यांचे लेखन असलेले हे दोन अंकी नाटक बसवले होते स्वागत थोरात यांनी. त्यांच्या बद्दल वेगळ्यानेच लिहायला हवे. पण कोल्हापुरात  'रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, मिड टाऊन' आणि 'सावी फाउंडेशन' यांनी हा प्रयोग घडवून आणला होता. प्रत्येक माणसाला व्यक्त व्हायचं असतं, त्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी अभिव्यक्ती साधने निवडतो. तशीच ही अंध मंडळी. यांना नाटकाद्वारे आपली कला सादर करायची होती. महाराष्ट्राच्या विविध भागातून शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी पुण्यात असलेल्या अशा या मुलांना एकत्र घेऊन हे नाटक बसवलं गेलं आहे. आपापली कामे, शिक्षण सांभाळत ही मुले नाटक करत आहेत. आणि नाटक करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडून आले आहेत असे ते ...

कासव- माझ्या नजरेतून

सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणार्‍या सुवर्णकमळासह अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत पारितोषिक पटकावणारा 'कासव' मी आज पाहून आले. माझे आवडते दिग्दर्शकद्वयी सुमित्रा भावे, सुनील सुकथनकार यांची अजून एक अप्रतिम कलाकृती. गेले काही दिवस मी पाहत असलेले चित्रपट हे खास 'माझ्यासाठी' बनवलेले आहेत, असं मला वाटतंय. त्यातला आशय, विषय, रचना, घटना हे माझ्याशी संबंधित असल्यासारखंच वाटतंय. (काही दिवसांपूर्वी 'बापजन्म' आणि आज 'कासव'), इतके की काही घटना आणि संवाद माझे आणि माझ्या आसपासचे असावेत असं वाटतंय. केवळ माझ्या मनात हा पाहून काय आलं, तेवढं लिहितेय नेहमीसारखं. 'नैराश्य' ही एकच थीम नाही या चित्रपटाची. माणूस हा समाजशील प्राणी आहे. आणि तरीही त्याला कधी कधी एकटेपणा हवासा वाटायला लागतो आणि या दोन परस्पर विरोधी प्रकृतीचा समतोल साधणं, हेच त्याचं जीवन आहे. कासवांसारखं तो कवचात जाऊन जगापासून स्वतःला फार काळ वेगळं ठेऊ शकत नाही. पण दुःख आत ओढून घेऊन बाह्य जगाला सामना करणं मात्र तो शिकतो.या समुद्री कासवांचं जीवनचक्र अगदी नवल वाटावं असं.. ...

रॉबिन्स वाली दिवाळी

अलीकडेच पिकलपोनीला अन्नाचं महत्त्व कळालं होतं, आणि ती अन्न अजिबात वाया घालवत नव्हती. ही भाजी नको, ती भाजी नको असली नाटकं आता एकदम बंद झाली होती. तरीसुद्धा त्या दिवशी उपाशी माणसांचं बघितलेलं ते दृश्य तिच्या डोळ्यांसमोर अजून काही हलत नव्हतं. कितीतरी लोक अजून अन्नापासून वंचित आहेत, रोजच्या रोज त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते हे किती वाईट्ट आहे हे तिच्या मनातून जायला तयार नव्हतं. तोच एकदवस दादुची मैत्रीण नूपुर घरी आली. नूपुर ताई पिकलपोनीची खूप आवडती होती. नवीन नवीन गोष्टी सांगायची, खूप वेगवेगळ्या गोष्टी करायची, एकदम तरतरीत आणि ऍक्टिव्ह. एके दिवशी ती आली एक ग्रीन टी-शर्ट घालून. त्यावर लिहिलेलं 'रॉबिनहूड आर्मी'. आत जाऊन दादा कपडे बदलून आला तर त्याने पण तसाच शर्ट घातला होता. आता पिकलपोनीला मोठीच उत्सुकता लागून राहिली. "नूपुर ताई, हे काय आहे? युनिफॉर्म आहे का? तुम्ही काय करणार आहात? रॉबिनहूड आर्मी म्हणजे काय? रॉबिन हूड म्हणजे तो गोष्टीतला का?" तिने प्रश्नांचा एकदम भडीमार सुरु केला. "ए बाई, आम्ही रॉबीनहूड आर्मीचे स्वयंसेवक आहोत. काम करायला जाणार आहोत. कळलं?", दादु...

उदरभरण नोहे..

"आई आज डब्यात काय ए?", दप्तर भरता भरता पिकलपोनीने विचारलं. "फरसबी आहे.. आणि डबा संपवला नाही ना पिकू तर मग बघ च."आई डबे भरता, भरता ओरडली. 'फरसबी' ऐकलं मात्र आणि पिकलपोनीने तोंड वेंगाडलं. "ए काय गं आई, तुला माहितीये ना मला नाय आवडत ना शेंगभाज्या, ", "अन्नाला असं घालून पाडून बोलू नये, लोकं मरतात अन्नावाचून, आपल्याला ते मिळतंय तर त्याचा मान राखा" असं म्हणत आईने दादू आणि पिकलपोनी कडे डबे सोपवले. "पिकू, तुला नेमकी कोणती भाजी आवडते गं? रोज तीच कटकट, डबा तसाच परत", दादुने मध्ये नाक घुसवलंच. पिकू चिडली. नाश्त्याला केलेले दडपे पोहे दडपायचेही त्या रागाच्या भरात राहून गेलं. दादू मज्जेत नाश्ता करत बसला. त्याला जीभ दाखवत पिकू शाळेसाठी निघाली. शाळेत पहिल्याच तासाला पिकूला भूक लागली. पण मधल्या सुट्टीला अजून होता वेळ. मधल्या सुट्टीपर्यंत कशीबशी भूक रोखून धरली. आणि एकदाची घंटा वाजताच उघडला डबा. पुन्हा डब्यात फरसबी बघून पिकूने डबा बंद केला. तिला पुन्हा राग आला. ''ही आई असं का करते? नाही आवडत मला भाजी तर मग दुसरं काही का नाही देत?",...

नवा मेंबर

शाळा सुरु होऊन २ महिने झालेले. पिकलपोनीनं या वर्षी एकदम शहाण्यासारखं वागून दाखवणार असं घरी कबूल केलं होतं. आणि त्याप्रमाणे ती वागतही होती.मागच्या वर्षी असंच ठरवलेलं काही कारणानी जसं फिस्कटलेलं ना, तसं यावर्षी बिलकुल होऊ देणार नव्हती ती.वेळच्या वेळी अभ्यास, कसला हट्ट नाही, दादूशी भांडणं नाहीत काही नाही. इतकी शहाण्यासारखी वागतेय म्हंटल्यावर सगळे पिकलपोनीचं कौतुक करतायेत,हे बघून दादुच्या मात्र पोटातच नाही, सगळ्या अंगभर दुखत होतं. इतके दिवस भांडण नाही म्हणून रु खरुख ही वाटायला लागली होती. ती अशी शहाण्यासारखी वागायला लागली की मग काय, सोसायटीत एकदम शांतता. एके दिवशी जोरदार पाऊस पडत होता, सुट्टी होती, पिकलपोनी झोपीसोबत खिडकीतून पाऊस बघण्यात गुंगली होती. अचानक त्यांना कसलातरी आवाज आला. लक्ष देऊन ऐकलं तर एका भूभू चा आवाज, कुठून येतोय, कुठून येतोय त्या शोध घ्यायला लागल्या. आवाजाच्या रोखाने जात जात पिकलपोनी आली कार पार्किंग मध्ये. इकडे बघ, तिकडे बघ करता करता गाडीच्या खाली बघितलं, तर दिसलं एक छोटूलं, हाडकुळं, तपकिरी,पांढरं कुत्र्याचं पिल्लू. वाऊ..भावू ..वाऊ असे आवाज करत कुडकुडत होतं बिचारं . ...

भांडण

"हॅलो दादू, कॉलेज नंतर डायरेक्ट घरी ये. ".. "असं आई म्हणतेय"..नाही नाही म्हणता म्हणता  पिकलपोनीने शेवटी दादूला फोन लावलाच.  दादुने पण टेचात विचारलं, "का? घरी पाहुणे येणारेत? मटन बनवलंय? का मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है?? नाही म्हणजे फक्त तेवढ्यासाठीच येत असतो ना मी घरी? असं काहीसं ऐकलं होतं मी.. " जरासं ओशाळून पिकलपोनी म्हणाली, "सॉरी ना रे दादू.. तू सारखा बाहेरच असतोस. पूर्वीसारखा आमच्या बरोबर घालवायला तुला वेळच नसतो.. रात्रंदिवस अभ्यास असतो. म्हणून चिडून तसलं काही तरी बोलले ना रे मी.. आता सॉरी की. प्लीज..प्लीज..प्लीज"...  दादा एकदम तोडून म्हणाला, "बरं.. बरं.. बघतो..जमलं तर चक्कर टाकतो दुपारी." फोन कट.  "हट, चक्कर टाकतो म्हणे. सरळ नाही येणार म्हणून सांग की" पिकलपोनी त्याची नक्कल करत स्वतःशीच चरफडली. "नाहीच येणार तो नक्की." त्याचं असं झालं होतं, पिकलपोनी आणो दादूचं कुठल्याशा फुसक्या कारणाने झालं होतं भांडण. भांडता भांडता भांडण एवढं वाढलं की दोघांना भांडणाचा मूळ मुद्दाच आठवेना. तरीही ओरडाओरडी झाल...

स्मृतिगंध लिसनर्स क्लब- राग यमन आधारित गीते

स्मृतिगंध लिसनर्स क्लब च्या या महिन्याची थीम होती 'राग यमन' वर आधारित गीते. राग यमन,  अतिशय लोकप्रिय आणि अतिशय मोठा आवाका असणारा. शास्त्रीय संगीत शिकणार्यांना सर्वाना पहिल्यांदा शिकवला जाणारा राग. हा जरी प्रथम शिकवला जाणारा राग असला आणि वरवर सोपा वाटत असला तरी त्यात 'Deceptive simplicity' आहे. संध्याकाळ चा राग असला तरी तरी कुठल्याही वेळी सादर केला जाणारा राग. शांत राग असला, तरी ही गंभीरता नसलेला, आल्हददायी शांती रस असणारा असा यमन राग. कार्यक्रमाची सुरुवात झाली या रागातील अत्यंत लोकप्रिय पारंपरिक चीज ' ए री आली पिया बिन' ने.  नंतरचे गाणे होते 'चितचोर' चित्रपटातील 'जब दीप जले आना'. अमोल पालेकर, झरीना वहाब सारख्या  कलाकारांच्या करिअरला झळाळी देणारा असा हा एक मिडल रोड सिनेमा. येसूदास आणि हेमलता यांच्या आवाजात असलेले हे गाणे, संगीतकार रवींद्र जैन यांनी संगीतबद्ध केलेलं. रवींद्र जैन हे दृष्टीहीन होते. 'जब दीप जले आना' म्हणजे काय हे त्यांना कसे काय कळले असेल? येसूदास यांना केरळ मधून हिंदी चित्रपट सृष्टीत आणण्याचे काम ही त्यांनीच केल...

स्मृतिगंध लिसनर्स क्लब- 'अनोखे बोल'

'स्मृतिगंध लिसनर्स क्लब' म्हंटल्यावर दर्दी संगीत प्रेमींसाठी पर्वणीच असते. या महिन्याच्या कार्यक्रमाची थीम ही अगदी अनोखी होती. 'अनोखे बोल'!! काही गाण्यातले काही शब्द खूप वेगळेच असतात, बऱ्याचदा त्यांचे अर्थ, प्रयोजनही आपल्याला ठाऊक नसते, तर कधी कधी त्यांना अर्थ असतंच नाही. पण तरीही ते गाण्याला मजा आणत  असतात. तर असे 'अनोखे बोल' असणारे रेकॉर्डस यावेळी वाजवण्यात आल्या. या आयोजकांचा संग्रह आणि अभ्यास आपल्याला पुन्हा-पुन्हा थक्क करून सोडतो. कुठून कुठून या रेकॉर्डस् मिळवल्या आणि त्याचा इतका डिटेल अभ्यास या मंडळींनी केला आहे, आश्चर्यचकित करून सोडतो.  यावेळचे पहिले गाणे होते राज कपूर च्या श्री ४२० मधले, 'रमैय्या वस्तावैय्या'. या गाण्याची कथा अशी की गीतकार शैलेंद्र एकदा एका अर्धवट बांधलेल्या इमारतीजवळून जात असताना तिथले आंध्र कामगार 'रमैया वस्तावैय्या' या बोलांचे तेलगू लोकगीत गात होते. शैलेंद्र च्या मनात हे शब्द पक्के बसले आणि ते त्यांनी आपल्या गाण्यात बसवायचे ठरवले. या किश्श्यासोबतच अजून एक योगायोग म्हणता येईल असा किस्सा की संगीतकार शंकर...

'Untagged New year'

I watched the series ' Untag' on Voot just now. And I just unserstood, yes! This is what I need to do! Untag myself. It doesn't matter, how people look at me, judge me or tag me.. Be it 'Bechari', 'Fat', 'Poor thing', 'patient' or blah.. first I need to free myself from these tags! I have loving parents, caring relatives, harami friends who are never there when you need them.. of course they all love me. They'll always do. But I realize now that I in the first place need to love myself! I used to think life has taken away blooming years of my life but then I realized life doesn't give you anything but chances.. You have to give something to life. You owe a lot to life! The best of you. New year resolution, enjoy life, come what may.. So dear Jindagi, here I come babyy - Rama..