Skip to main content

Posts

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ...

'कारखानीसांची वारी Ashes on a road trip

 मंगेश जोशींचा 'कारखानीसांची वारी' हा अतरंगी चित्रपट पाहिला. लिओ टॉलस्टॉयची एक अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे ऍना कॅरेनिना. त्याच्या सुरुवातीला एक कोट आहे. "All Happy families resemble one another, but each unhappy family is unhappy in its own way.’'. 'कारखानीसांची वारी Ashes on a road trip' हाही या कोटने सुरू होतो. एक सर्वसाधारण एकत्र कुटुंब. ज्यातील ज्येष्ठ व्यक्ती पुरुषोत्तम कारखानीस याचे निधन झालेले आहे. त्याच्या अंतिम इच्छेनुसार आता त्याचे 3 वयस्कर भाऊ , एक बहीण आणि मुलगा त्याच्या अस्थी गावाकडल्या घरात, शेतात आणि शेवटी पंढरपूरला चंद्रभागेत विसर्जित करण्यासाठी निघाले आहेत. अस्थीविसर्जन झाल्यानंतर एका लाखोट्यातील पत्राचे वाचन करावे असेही सांगून ठेवले आहे. आता कारखानीस परिवार एक टिपिकल मध्यमवर्गीय एकत्र कुटुंब आहे. एकत्र असूनही प्रत्येकाची वेगळीच कहाणी आहे. वेगळीच सुखदुःखे, जगण्याची ओझी आहेत. पण एकमेकांना सांगायची चोरी असे हटवादी आणि अहंकारी प्रत्येकाचे स्वभाव. लखोट्यातील पत्रात इच्छापत्र असेल आणि माझ्या वाट्याला काही ना काही नक्कीच आले असेल जगणे तरून जायला असा प...

शांतीत क्रांती - मैत्री, विनोद आणि आत्मभानाची गोष्ट

काल खूप दिवस ज्याची वाट पाहणं सुरू होतं त्या ' शांतीत क्रांती ' या वेब सिरीजचं binge watch केलं. सारंग साठ्ये, पॉला मॅक्ग्लिन  दिग्दर्शित या बहुचर्चित सिरीज मध्ये 3 मित्रांची कथा आहे. प्रसन्न ( ललित प्रभाकर ), श्रेयस ( अभय महाजन ) आणि दिनार (आलोक राजवाडे ) यांची ही आजच्या तरुणाईला रिलेट होईल अशी गोष्ट. तीन मित्र, अगदी लंगोटी यार. अगदी 'हम दोस्त थे, दोस्त है और हमेशा रहेंगे' कॅटेगरी. तिघे गोवा रोड ट्रिप प्लॅन करतात पण श्रेयस त्या दोघांना 'शांतीवन' या ठिकाणी आणतो. एका ध्यान आश्रमासारखी ही जागा. या मित्रांच्या वरवरच्या हसत्या-खेळत्या आयुष्यात आत वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, जे ते शेअर करत नाहीत.तिघेही वरून आनंदी दिसले तरी आतून पार गोंधळलेले, विस्कळीत मनस्थितीतले. आपल्याला बऱ्याचदा डिनायलमध्ये जगण्याची सवय असते,  बऱ्याचदा आपला स्वतःचा स्वतंत्र विचार, मत न मांडता, लोक काय म्हणतील याचाच विचार करून, 'मी कोण आहे, मला नेमकं काय हवंय?' हे प्रश्न आपण स्वतःलाही विचारत नाही. त्यामुळे काही केल्या वास्तवाचा आपण स्वीकार करत नाही. आपण जसे आहोत त्या आपल्यातल्या मूळ व्यक्ती...

सुमित्रा भावे - न सोसणारी एक्जिट

 सुमित्रा भावे गेल्या. माझी आवडत्या दिग्दर्शक जोडगोळीची अपरिमित हानी झाली. या बाईंनी मला काय काय दिलं त्यांच्या चित्रपटातून. दहावी फ, दोघी, देवराई, अस्तु, वास्तुपुरुष, कासव.   नुसतं भरभरून देणं, देणं आणि देणं. मला त्यांची शैली अफाट आवडायची. एक प्रयोगशील आणि दर्जेदार कलावंत हरपला. नेमकं काय आणि कसं बोलावं कळत नाही. सुन्न व्हायला होतं आहे. वयाच्या 78व्या वर्षी ही व्यक्ती चुटपुट लावून जाते. अर्थात सगळ्यांच्या मरणाने असाच त्रास होतो, पण मला राग येतो आहे. असं कोणी जातं का?  निसर्गाने असं कसं करावं असं काहीसं त्यांच्या विचारांच्या विसंगत मनात येत आहे.  विविध सामाजिक प्रश्न, त्यांचा नात्यांवर होणारा परिणाम, बंधने, जीवाची होणारी घुसमट याने पिचणारी स्थिती त्यांनी अनेकदा पडद्यावर चितारली. उपायही सुचवले. प्रेक्षक थोड्या थोडक्या का प्रमाणात त्या प्रश्नाबाबत डोळस आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊन बाहेर पडायचे. 10 राष्ट्रीय पुरस्कार मिळवणं येऱ्यागबाळयाचं काम नाही. सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या सुवर्णकमळासह इतर अनेक पुरस्कारप्राप्त 'कासव'. असुरक्षित वाटलं की कासव...

द मॅरीड वूमन - रिक्त की मुक्त?

Alt बालाजी ची नवीन वेब सिरीज द मॅरीड वूमन पाहिली. मंजू कपूर यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित. आस्था एक ड्युटीफुल, कर्तव्यदक्ष बायको, सून, आई पण त्याच बरोबर एक कॉलेज टीचर. संथ आणि एकसुरी बनलेलं आहे तिचं आयुष्य. सतत गृहीत धरलं जाणं, सतत दुय्यम वागणूक. पण विना तक्रार नाती निभावत राहायचं. कारण समाजाने तसे नियम आखलेत. तिची कहाणी तीच आपल्याशी बोलत सांगते पूर्णवेळ.  ऐजाज खान(इमाद शाह), तिने लिहिलेले नाटकाचे दिग्दर्शन करणारा एक स्वतंत्र, पुरोगामी विचारांचा, सर्वधर्मसमभाव मानणारा, त्याच्याकडे ओढली जात आहे आस्था पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो आणि तिच्या आयुष्यात येते पिपलिका.(मोनिका डोग्रा) ऐजाज ची विधवा. एक आर्टिस्ट. आस्थाहून खूप निराळी. दोघी दोन ध्रुवांसारख्या, तरी एकमेकींच्या जवळ खूप जवळ येतात, प्रेमात पडतात. पिपलिकाच्या मते, "प्यार जेंडर नही, रुह देखके होता है".  काय आहे नक्की या दोघींचं नातं? केवळ तनाचं की मनाचंही? भावनांचा कोसळणारा प्रपात, जो चिंब करत आहे दोघींनाही. हे सगळं हवं हवसं आहे आस्थाला. पण ती विवाहित आहे, तिला एक सर्वसाधारण कुटुंब आहे, मुलं आहेत. ती त्यांना सोडून ...

हर

आपण याच यंत्रयुगात इतके अवलंबून आहोत यंत्रांवर, obsessed आहोत की नजीकच्या भविष्यात जर आपण त्यांच्या प्रेमात पडलो तर नवल नाही. ही गोष्ट फक्त थिएडोर (Joaquin Phoenix) आणि एक ऑपरेटिंग सिस्टीम समँथा (आवाज- Scarlett Johansson) यांच्यातल्या नातेसंबंधाची नाही.  एकलकोंडा, बायकोपासून विलग अशा थिएडोरला एकटेपणा घालवायला कुणीतरी हवं आहे. मग ते एखादी ऑपरेटिंग सिस्टीम का असेना तो तयार आहे. समँथा आणि थिओ यांच्यात एक नातं तयार होतं जे मैत्रीपलीकडे आहे. एकटेपणा, नैराश्य, शारीरिक गरज भागवण्याइतपत तो समँथाच्या केवळ आवाजावर  अवलंबून आहे की अजून काही जास्त भावना आहेत? ती सतत म्हणते तसं तिला भावना आणि शरीर प्राप्त होतं का? थिओडोरप्रति तिच्या वागण्याला भावना म्हणायचं का? त्या दोघांच्या नात्याला प्रेम म्हणायचं का? डिवोर्स पेपर्सवर सही घेण्यासाठी तो बायकोकडे जातो तेव्हा बायको तो यंत्रासोबत रिलेशनमध्ये आहे हे कळल्यावर त्याला नात्यांपासून दूर पळणारा, स्वप्नात रमणारा, सत्य झटकणारा, परिस्थिती नाकारणारा म्हणते. समँथा सोबततरी नाते स्थिर राहणार का? या साऱ्यांची प्रश्नोत्तरे म्हणजे लेखक, दिग्दर्शक Spike Jonze...

शरदचंद्र चटोपाध्याय

शरदचंद्र चटोपाध्याय हे एक मोठे बंगाली साहित्यिक होते. उपेक्षितांचे अंतर्बाह्य चित्रण करणारे,  परंपरेच्या जोखडात अडकलेला समाज, खास करून स्त्री वर्ग यांच्या व्यथांचं कथन बंगाली साहित्यात 'शरद साहित्य' म्हणून एक मानदंड ठरलं. आजही आहे. भारतीय साहित्यात त्यांचे योगदान दूरगामी व परिणामकारक आहे.  त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1876 रोजी झाला.  कॉलेजात असताना त्यांनी 'भागलपूर साहित्यसभेची' स्थापना करून 'छाया' हे हस्तलिखित सुरू केले. रवींद्रनाथांसारखं अभिजात साहित्य जन्माला घालायचं त्यांचं स्वप्न होतं. गरिबीमुळे त्यांना शिक्षण ही अर्धवट सोडून द्यावं लागलं. पण त्यांचं साहित्यावरील प्रेम कधीच कमी झालं नाही. पैशाच्या चणचणीमुळे त्यांनी नोकरी धरली, त्यांचे संवेदनशील मन समाजातील तळागाळातून सुख-दुःखाचे निरीक्षण करत होते त्यावेळी त्यांची 'बडदीदी' ही अप्रकाशित कादंबरी कोलकात्यात 'भारती' मासिकात क्रमशः छापून आणली गेली आणि बंगाली साहित्यात 'शरदचंद्र' उदयाला आला. शोषित, मूक, दबलेल्या समाजाचा आरसा म्हणजे त्यांचं साहित्य. कल्पनारम्यतेऐवजी वास्तवतेकडे झुकणारा असा त्या...

गुलाबो सिताबो : बेग़मने खाल्लेला चित्रपट

बॉलीवूडमध्ये इतके हुशारीने बनवलेली 'ड्रॅमॅटिक सटायर' फारच कमी. डार्क कॉमेडीचा इतका सुंदर वापर  'जाने भी दो यारो' इतका नसला तरी तरी वेगळ्या खुबीने केला आहे. जुही चतुर्वेदी लिखित आणि शुजित सरकार दिग्दर्शित हा 'गुलाबो सिताबो' हा तो चित्रपट.लखनौ शहराची पार्श्वभूमी, मोडकळीस आलेली 'फातिमा महल' नामक खास लखनौवी हवेली, त्याची मालकिण बेग़म (फ़ारुख़ जाफ़र) हिचा नवरा एक हावरट, कंजूस ' सतत आयजीच्या जीवावर' असलेला ८० ला येऊनही ही हवेली कधीतरी आपल्या मालकीची होईल या भ्रमातला म्हातारा मिर्झा , आणि ढेर सारे भाडेकरू. अगदी ३०रु ते ७० रु इतक्याशा भाड्यावर राहणारे. आयुषमान खुरानाने साकारलेला 'बांके' हा 'मै गरीब हू' म्हणत आपल्या बहिणींना सांभाळणारा भाडेकरु सतत भाडे देण्यास कुचराई करण्यात पटाईत. यांच्या आयुष्यात पुरातत्व खात्याचे लोक आणि बिल्डर मंडळी यांची एन्ट्री होते आणि एरवी एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त मिर्झा (अमिताभ बच्चन) आणि बांके (आयुषमान) यांची अवस्था सुरुवातीला आणि शेवटाला दाखवलेल्या गुलाबो आणि सिताबो या कठपुतळ्यांसारखी होते.  अमिताभ बच्चनचे ...

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

क्युरिअस केस ऑफ बेंजमिन बटन : अंतापासून आदिकडे

एफ. स्कॉट फिट्झगेराल्ड लिखित शॉर्ट स्टोरीवर आधारित चित्रपट, ' क्युरिअस केस ऑफ बेंजमिन बटन '. अतिशय वेगळी अशी कथा आहे बेंजमिनची, आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या पात्रांची. असा बेंजामिन जो जन्माला येताच 80+ वर्षाच्या म्हाताऱ्यासारखा. जन्मदात्री आई मरून जाते तर त्याचे वडील मिस्टर बटन त्याचा त्याग करतात, एक आफ्रिकन अमेरिकन कुटुंब त्याला आपलं म्हणून सांभाळतात. वय जसं वाढतं तसं बेंजामिन मात्र अधिकाधिक तरुण होत जातो. आणि याच गोष्टीमुळे त्याचे सखे-सोयरे, प्रेयसी यांच्यासोबतच्या त्याच्या नात्यांवर कसा परिणाम होतो, जन्मानंतर पाळण्यातला बेंजामिन, मृत्यूपूर्वीही पाळण्यातले लहान बाळ होऊन जातो. याची ही विचित्र कहाणी.  चित्रपटातील ब्रॅड पिट, केट ब्लाँचेट, ताराजी हॅन्सन यांचा अभिनय आउटस्टँडिंग आहेच पण डेव्हिड फिंशरचे दिग्दर्शनही छान आहे. कथा मांडणी सुंदरपणे केली आहे. प्रोस्थेटिक मेकअप, स्पेशल इफेक्ट्स, एडिटिंग याबाबतीत ही फिल्म अभ्यासली पाहिजे इतकी सरस आहे.  चित्रपटाची कथा एका मरणासन्न वयस्क बाईच्या डायरीतून उलगडते आणि ती नंतर सुरू होणाऱ्या कॅटरिना हरिकेनइतकी गुंतागुंतीची आहे....

Pursuit of Happiness : आनंदाचा अथक शोध

परसूट ऑफ हॅपिनेस : आनंदाचा अथक शोध आयुष्यात आनंद कुणाला नको असतो? कुणाला भौतिक सुखात तर कुणाला आत्मिक समाधानात आनंद मिळतो. जो तो आनंदाच्या शोधात आहे, सगळ्यांचं एकच ध्येय आहे. Pursuit of Happiness.  या सिनेमाची कथाही एक खऱ्या चरित्रावर बेतलेली आहे. ख्रिस गार्डनर ( विल स्मिथ ), ख्रिस्तोफर ज्युनिअर ( जेडन स्मिथ ) हे खऱ्या जीवनातले बापलेकच यात दाखवले आहेत. एक बोन डेन्सीटी स्कॅनर मशीन, ज्याला फारशी मागणी नाही विकणारा सेल्समन ख्रिस व्यावसायिक पतनामुळे हैराण असतो. त्याची बायको मुलाला त्याच्यापाशी ठेवून निघून जाते, राहतं भाड्याचे घर जाते, शेअर बाजारात काम करण्यासाठी इंटर्न म्हणून विनापैसा ख्रिसला काम मिळते आणि मग सुरू होतो एक संघर्ष. आनंदाचा अथक शोध. घर नाही तर कधी पब्लिक टॉयलेटमध्ये तर कधी ट्रेन, बसमध्ये, स्वस्त डॉर्मिटरी मिळेल तिथे मुलाला घेऊन राहणे, खिशात, बँकेत पैशाचा खडखडाट असून सकारात्मक राहून गुजराण करण्यासाठी त्याची राहिलेली मशिन्स त्याला विकायची असतात. अनेक संकटांना सामोरं जाताना हा सिनेमा आपल्याला खूप काही शिकवतो. सकारात्मक दृष्टिकोन, हार न मानणे, स्वप्नांच्या पूर...

Once in a year..

मुलगा अरिहंत ( Nipun Dharmadhikari )   आणि मुलगी रावी (मृण्मयी गोडबोले) भेटतात, त्यांची गोष्ट. वर वर साधं- सोपं वाटलं तरी वास्तवात असतं तसं क्लिष्ट असं त्यांचं नातं. 'वन्स इन अ यर' ही 2013- 2018 या वर्षांत घडणारी गोष्ट ( टायटल सॉंग अप्रतिम आहे, ऐकायला आणि बघायलाही). वय वाढतं तसं नात्याची परिपक्वता वाढत जाते तसेच प्रॉब्लेम्सही.  निपुणचा अभिनय पहिल्यांदाच पाहिला. सहज आहे, ओढून-ताणून नाही, कॅज्युअल आहे. मृण्मयीचे कॅरेक्टरही छान. दोघेही एकदम पुणेरी.  यातली सिनेमॅटोग्राफी ही एक उल्लेखनीय बाब आहे. लोकेशन्स छान आहे.  MXPlayer वर आहे. बघा जरूर.   - ©रमा

बदल

रात्री पिक्चर बघत बसले होते , ' गुडबाय ख्रिस्तोफर रॉबिन ' आणि मी शर्यंत लागल्यासारखी धावत   फेसबुकवर लिहून टाकणार तोपर्यंत पिकलपोनीचा फोन . आवाजात सर्दी , खोकला , " हॅलो , मी पिकलपोनी बोलतेय." तोपर्यंत दादू तिच्याकडून फोन घेत म्हणाला   "अगं रमाताई तू जरा ये घरी."     मी म्हणाले , " का रे अचानक ? खरंतर मला यायचं असतं , पण राहून जातं.." , दादू म्हणाला , " हे बघ , आम्ही ४ मंडळी सायकलवर मावणार नाही गं , गाडी घेऊन ये.".   मला काही कळेना. " चौघांना जायचंय कुठं खरं ?". पण मग " डॉक्टरांकडे जायचंय." एवढं ऐकताच मी पटकन निघाले. पोहोचते तर बघते काय ? सगळे बाहेर. दादू , पिकू मरगळून उभे. ” डॉक्टर आत्त्यांकडे गेल्यावर त्यांना तपासून , काही फिल्म्सची यादी , खेळ , पत्रलेखन वगैरे औषधं लिहून त्यांना बाहेर बसायला सांगून डॉक्टर आत्यांनी मला थांबायला सांगितलं. मला बसवून बोलायला लागल्या, " रमा , तू लिहून यांचं जग , पिकलवर्ल्ड   बाहेर , आपल्या जगात आणलंस. पण त्यांना कायमचं इथे वास्तवात आणायची ही कसली धडपड ? राहू दे की त्यांना पिकलवर...

हलाल - बलिदान

मुस्लिम धर्मात 'हलाल' चा अर्थ आहे, वैध किंवा धर्मानुसार योग्य बलिदान. त्याप्रमाणेच हलाल चा अर्थ एखाद्या जीवाला हाल-हाल करून मारणे. हलाल ची वैवाहिक रूढी अशी की एखाद्या माणसाने जर आपल्या बायकोला त़लाक दिला आणि तिच्याशीच परत लग्न करायचे झाले तर आधी तिचे दुसरे लग्न लावायचे त्या व्यक्तीने जर आपणहून तिला (तीन महिने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेऊन बिऊन) त़लाक दिला तर ती प्रथम पतीशी लग्न करू शकते. पुरुषाने उठसूट काडीमोड घेऊ नये यासाठी त्याला शिक्षा म्हणून असला विपरीत कायदा कुराण-ए-पाक मध्ये समाविष्ट होता. धर्मातील कायदे न समजून घेता तोडून -मरोडून लोकांपर्यंत येतात आणि मग 'ख़ुदा के लिए' ते त्याचे पालन करतात त्याने धर्माचा आंधळेपणा, समाजाचा दुटप्पीपणा आणि परिणामी लोकांचे हलालरूपी शोषण होते. तिहेरी त़लाक विरोधी अशी 'हलाल' ची कथा राजन खान यांच्या कादंबरी वरून घेतलेली आहे.  हलीम आणि खुर्दुस हे एक विवाहित जोडपे आहे, पण रागाच्या भरात खुर्दुस हलीमला तोंडी तिहेरी त़लाक देतो. 2 वर्षा साठी हलीमला माहेरी पाठवतो आणि आई वारल्यावर पुन्हा न्यायला येतो. पण वडील सरपंच आणि मौलाना प...

ऑक्टोबर : नात्याला या नकोच नाव

सगळ्याच नात्यांना नाव नसतं. सगळ्याच भावनांत आर्तता नसते. सगळ्याच कथा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाटतीलच असं नाही. पण ‘ ऑक्टोबर ’ मला स्वतःचा वाटला. डॅन आणि शिवली. हॉटेल मॅनेजमेंट इंटर्न्स , एकमेकांशी अगदी मोजका संवाद असलेले , सहकारी इतकेच काय ते त्यांचे नाते. डॅन बेफिकीर , अस्ताव्यस्त , कामात लक्ष नसलेला , बेधडक आणि कधी कधी दुखेल असे बोलणे तरी थोडा निष्पाप तर शिवली शांत , कामात सिन्सिअर. ‘ दोन ध्रुवावर दोघे आपण ’ असे त्यांचे अत्यंत विरुद्ध स्वभाव. एका अपघातामुळे शिवली कोमा आणि नंतर त्यासदृश परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये बेडला खिळलेल्या अवस्थेत आहे आणि नंतर डॅन मध्ये या घटनेने जे बदल घडत जातात आणि त्यांचे एक अतूट बंधन निर्माण होते त्याची ही सुगंधी कथा. डॅन अधिकाधिक शिवलीची काळजी करू लागतो , त्याच्या रोजच्या भेटींमुळे त्याच्या इतर सहकाऱ्यांना त्याचे वागणे विचित्र वाटते. असे काही होऊ शकेल आणि तेही डॅनकडून असे कुणालाही विचित्रच वाटेल. पण त्याचे शिवलीकडे वारंवार जाणे , याने त्याचा स्वभाव बदलतो. एरवी बालिश वाटणारा डॅन शिवलीच्या प्रत्येक बाबतीत सीरियस वागू लागतो. चित्रपटातील डॅन - शि...

सेक्रेड गेम्स- सीजन 2

प्रभू रामचंद्राच्या वनवासानंतर अयोध्या नगरीने ज्या आतुरतेने त्यांची वाट पाहिली असावी तशी नेटफ्लिक्सवासीयांनी GOT, Narcos नंतर 'सेक्रेड गेम्स' च्या पुढच्या सीजन ची वाट पाहिली आणि पदरी दर दोन शिव्यानंतर अजून शिव्या असं काहीसं आलं.  झालं काय की ते, 'कुकू का जादू बादू' यात काही नव्हतं. यात सत्य होतं. आयुष्यातले सगळे दरवाजे बंद झाले की हतबल मनुष्य जितकी धडपड करता येईल तितकी करतो, मारतो, उडवतो, ओरडतो,  गुरु-पंथाच्या नादी लागतो, गंडे- दोरे बांधतो. ज्यावर विश्वास नाही ते सारेही करून पाहतो. गायतोंडेचा(नवाजुद्दीन) तिसरा बाप 'गुरुजी' हाही एक प्रकारचा झिंग देणारा धार्मिक कल्ट चालवत असतो जो मुंबई खतम करण्यासाठी गायतोंडेचा वापर करत असतो.  मागील सीजन गायतोंडेचा होता, त्याने कमाल केली. दुसरा सीजन सरताजसिंग (सैफ) चा आहे. तो शोधात आहे. जे काही सापडत आहे तो चकित आहे , शोधण्यासाठीची धडपड गायतोंडेचा इतिहास आणि संपणारी मुंबई, धर्माचे राजकारण आणि राजकारणातील भ्रष्ट्राचार हे सगळं इथं दाखवायचा प्रयत्न आहे. सीजन 1 पाहिला नसेल तर यातील 1-1 मूव्हचं संदर्भासहित स्पष्टीकरण कराव...

सेक्रेड गेम्स सीजन - १

सरताज सिंग ( सैफ अली खान ) या प्रामाणिक पोलिसाला अचानक माफिया जगतातील खूप मोठ्या गँगस्टर गणेश गायतोंडे( नवाजुद्दीन ) कडून टीप मिळते, की काहीच दिवसात मुंबई संपेल. आणि सुरू होतो एक खेळ माफिया, पोलीस जगत, राजकारण, सेक्सवर्कर्स, धर्म, यांचा खेळ. अश्वत्थामा, हलाहल, ययाती असे एपिसोडस्. (त्यांची नावे तशी का आहेत हे बघायला नीट पाहायला लागेल. दिवस फ्री असेल तर Bingworthy आहेच)  नवाजुद्दीनने नेहमीप्रमाणे काम छान केलं आहे पण तो मराठी माणूस नाही वाटत. गायतोंडे नाही वाटत. बाकी त्याचं काम सुंदर. मराठी नसता तर अजून चांगला इफेक्ट आला असता. कुकू, बंटी अशी काही पात्रं महत्त्वाची आहेत. सैफ अली खानने त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी झेप इथे घेतली आहे. गिरीश कुलकर्णी, राधिका आपटे अशा मराठी लोकांसोबतच भाव खाऊन जातो तो जितेंद्र जोशीने साकारलेला (काटेकर). जीव ओतणारा प्राणी. आहा. अप्रतिम.  शिव्यांनी ओतप्रोत भरलेला, सेक्स, हिंसेने भरलेला. सेक्रेड गेम्स.  बॉलिवूडमध्ये किंवा नव्या पिढीच्या वेब सिरीज जगतात क्रिमिनल वर्ल्ड हे अगदी रोजची उठण्याची - बसण्याची जागा अशी रंगवलेली आहे. एकदम...
कोल्हापूरचा महापूर नको नको ते राहून गेले हवे हवे ते, वाहून गेले पूरात उरल्या सुरलेल्यांना सैतानच मग पाहून गेले ढग फुटले नि कोसळला रात्रंदिवस धो धो ढळला किंकाळ्या मूक प्रेतांच्या ऐकून, पाहून तळमळला गुरे-ढोरे, जमिनी घरकुल आणि फुटके-तुटकेसे पूल जीव वाचूनही सारे गेले जसे एखादे कुस्करले फूल म्हणे 'कलयुग' आले कोणी कुणी सांगी भविष्य वाणी मला फक्त दिसत राहते भयाण पावसाचे पाणी आले उठून हात मदतीचे दिवस-रात देण्या साथीचे कोण-कुणाचे नाही तरीही 'आपला' या एका नात्याचे एकमेकांपासून होते दूर जोडी त्यांना हा  महापूर मदतीला जे पुढे धावते ते कोल्हापूर, ते कोल्हापूर  - ©रमा PC-The Hindu

मेरी यादमें तुम ना आंसू बहाना...

25 जून 1924 ला मदन मोहन कोहली यांचा जन्म इराणी कुर्दीस्तान येथे झाला. त्यांचे वडील बहादूर चुनीलाल तिथे अकाऊंट जनरल म्हणून काम करत. लहान वयातही मदनमोहन यांना गाण्याचा भलता शौक होता. आणि वडिलांच्या रेकॉर्ड कलेक्शन मधील कुठलेही गाणे स्वतः काढून ऐकण्याचा छंद ते अति लहानपणी सुद्धा कधीही पुरा करू शकत होते. त्यांना लाहोर ला त्यांच्या आजोबा हकीम योगराज यांच्याजवळ ठेवून त्यांचे कुटुंब मुंबईला स्थायिक झाले. लाहोर ला शालेय शिक्षणासोबतच त्यांनी थोडे शास्त्रीय संगीत शिक्षण स्थानिक शिक्षकांकडे घेतले. भारतात आल्यावर वडिलांच्या इच्छेखातर 1943 मध्ये मदन मोहन आर्मीत रुजू झाले. पण त्यांचे पहिले प्रेम संगीत. त्यामुळे त्यांनी वडीलांच्या अनिच्छेने देखील आर्मी सोडली आणि 1947 मध्ये ऑल इंडिया रेडिओ, लखनौ येथे प्रोग्रॅम असिस्टंट म्हणून काम पाहू लागले. काही कार्यक्रमांच्या प्रसारणाचे संगीतही त्यांनी दिले. संगीतातील दिग्गज कलाकारांचा, कार्यक्रम आणि प्रसारण यासाठी त्यांना प्रदीर्घ सहवास वेळोवेळी मिळाला. त्यांचे खरे शास्त्रीय संगीत शिक्षण सुरू झाले ते इथेच. तराण्यांची राणी जद्दन बाई (भारतातील मोजक्या महिला...

रिंगण! सुटता तुटेना माऊली..

रिंगण! आज घरातल्या देव्हाऱ्यात एकलाच उभा पांडुरंग बघून मकरंद माने दिग्दर्शित 'रिंगण' ची आठवण आली. अर्जुन मगर (शशांक शेंडे) आणि त्याचा मुलगा अभिमन्यू (साहील जोशी) या बापलेकाची कथा.  दुष्काळाने कर्जाच्या ओझ्यात पिचलेला शेतकरी, त्यात गहाण गेलेली जमीन. आत्महत्येचे सततचे विचार झटकून, पोरासोबत पंढरपूराला जातो. पोराची आई देवाच्या गावाला गेली असं सांगितल्यामुळे, इथे माझी आई सापडेल अशी आशा घेऊन आलेला 7-8 वर्षाचा त्याचा मुलगा. निराशेतून आत्मविश्वासाने, श्रद्धेने सकारात्मक मार्ग दाखवणारा 'रिंगण'.  बापलेकाचे नाजूक नाते, पापभिरू निष्पाप अर्जुन मगर आणि त्याचा निरागस मुलगा अभिमन्यू पंढरीच्या गावी तरी काही पदरी पडेल का अशी आशा करत आलेले असतात त्यांची कथा. पंढरपूरला वारीला रिंगण सोहळे असतात त्यामुळे तर हे नाव साजेसे आहेच पण आपण ज्याला चमत्काराच्या अपेक्षेने शोधत फिरतो, तो कुठे ना कुठं आपल्या सोबत निरनिराळ्या रूपात सकारात्मकता देऊन जातो. आपल्या मातीशी सुरू झालेला प्रवास पुन्हा आपल्या मातीशी नेऊन पोहोचवतो असे रिंगण. आपल्याजवळ जे नाही त्या पळत्याच्या पाठी धावता आपण हातचं स...