'स्टारडम' ही संकल्पना क्षणिक असणाऱ्या काळातही दिलीपकुमार हा एक दुर्मिळ अभिनेता आहे जो मनोरंजन क्षेत्रात 58 वर्षानंतरही तंबू ठोकून उभा राहिला. दिलीपकुमारने सहा दशकाच्या कारकिर्दीत केवळ 56 चित्रपट केले. पण प्रेक्षकांसोबत लगेच संवाद साधण्याचं अलौकिक वरदान त्याला लाभलेलं होतं, ज्याने त्याला हिंदी सिनेमात अनेक क्लासिक्स देता आले. पेशावरहून पळून आलेला , पुण्यातील एका मिलिटरी कँटीन मध्ये काम करत करत फळांच्या दुकानाचा मालक बनलेला युसूफ खान. त्याच्यातला अभिनेता जागा होऊन त्याची अभिव्यक्ती युसूफ खानला मुंबईला घेऊन आली. बॉम्बे टॉकीजची महत्त्वाची नियंत्रक देविका राणी, अशोककुमार नंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी कोणा प्रतिभावंताच्या शोधात होती. युसुफच्या गुणवत्तेवर प्रसन्न होऊन त्याला 'ज्वार भाटा' मध्ये हिरो म्हणून ब्रेक मिळाला. देविका राणीने अत्यंत कडक शिस्तीने आणि कठोर शासनाने स्टुडिओ वर पकड ठेवली होती. अभ्यासण्यासाठी भरपूर सामान आणि सृजनशील वातावरणाने या गुणी कलाकाराला पाया मजबूत करता आला, ज्याने त्याच्यातला उत्कृष्ट अभिनेता बाहेर आला जो आज एक लेजंड आहे. न...
सुचेल ते, रुचेल ते, दुखेल ते, खुपेल ते.. Random Mindnotes..